Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Cricket: पणजी जिमखान्यावर रंगणार रणजी सामन्याचा थरार, गोव्याचा 'हुकमी एक्का' जायबंदी; यजमानांना सतावतेय पाहुण्यांची चिंता

Goa Vs Nagaland: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटात नागालँडने मागील दोन सामन्यात गोव्याप्रमाणेच दमदार खेळ केला.

Manish Jadhav

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटात नागालँडने मागील दोन सामन्यात गोव्याप्रमाणेच दमदार खेळ केला. दोन्ही संघांचे समान तेरा गुण असल्यामुळे गटातील अव्वल स्थानासाठी चुरस आहे. या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील संघातील कर्नाटकी पाहुण्या क्रिकेटपटूंची यजमान संघाला जास्त चिंता असेल.

तब्बल 18 वर्षांनंतर स्पर्धा

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर चार दिवसीय सामना शनिवारपासून (ता. 26) खेळला जाईल. तब्बल अठरा वर्षांनंतर या मैदानावर रणजी करंडक क्रिकेट सामना होत असल्याने नव्या मोसमातील खेळपट्टी कशी असेल याची कोणालाच खात्री नाही.

हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई जायबंदी!

हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता कमी असल्याने दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ शकतो. सुयशने शुक्रवारी सराव सत्रात भाग घेतला नाही. त्याने यंदा दोन डावांत एका शतकासह 174 धावा केल्या आहेत. सुयश खेळला नाही, तर त्याच्या जागेसाठी राहुल मेहता व कश्यप बखले यांच्यात चुरस असेल. याशिवाय, अष्टपैलू या नात्याने दीपराज गावकरही संघात पुनरागमन करु शकतो. त्याची निवड झाल्यास वेगवान हेरंब परब किंवा शुभम तारी यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल.

अखेरच्या लढतीत गोव्याचा पराभव

दरम्यान, या मैदानावर 17 ते 20 जानेवारी 2006 या कालावधीत झालेल्या अखेरच्या रणजी करंडक लढतीत हिमाचल प्रदेशने गोव्यावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला होता. माजी कसोटीपटू देबाशिष मोहंती यांच्या मार्गदर्शनाखालील नागालँड संघातून खेळणारे कर्नाटकचे पाहुणे क्रिकेटपटू सध्या फॉर्ममध्ये आहेत. डी. निश्चल याने दोन शतकांसह तीन डावांत 352 धावा केल्या आहेत. कर्नाटकचाच डावखुरा फिरकी गोलंदाज जे. सुचित याने 17 गडी बाद केले आहेत. त्यांचा कर्णधार राँगसेन जोनाथन याने अष्टपैलू चमक दाखविताना एका द्विशतकासह 259 धावा, तसेच 11 गडी बाद केले आहे.

नागालँडसाठी स्वप्नीलचा अनुभव फायदेशीर

गोव्याचे माजी कर्णधार, सफल फलंदाज स्वप्नील अस्नोडकर नागालँडचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागालँडची फलंदाजी बहरली आहे. नागालँडने तीन डावात प्रभावी फलंदाजी करताना एकत्रित 1,052 धावा केल्या आहेत. अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्यांनी पहिला डाव 5 बाद 509 धावांवर घोषित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Viral Video: बापाने मुलाकडून घेतली अशी शपथ, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक; 'स्वतःचा जीव पणाला लावून...'

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

SCROLL FOR NEXT