Ranji Cricket: रणजी प्लेट गटात वर्चस्वासाठी चुरस; गुणतालिकेत नागालँड अव्वल स्थानी तर गोवा दुसऱ्या स्थानी
Ranji Trophy CricketDainik Gomantak

Ranji Cricket: रणजी प्लेट गटात वर्चस्वासाठी चुरस; गुणतालिकेत नागालँड अव्वल स्थानी तर गोवा दुसऱ्या स्थानी

Ranji Trophy Cricket Tournament Points Table: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटात दुसऱ्या फेरीनंतर नागालँड व गोवा यांच्यात वर्चस्वासाठी जोरदार चुरस असून त्यांच्यात शनिवारपासून (ता. २६) खेळला जाणारा चार दिवसीय सामना महत्त्वपूर्ण ठरेल.
Published on

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटात दुसऱ्या फेरीनंतर नागालँड व गोवा यांच्यात वर्चस्वासाठी जोरदार चुरस असून त्यांच्यात शनिवारपासून (ता. २६) खेळला जाणारा चार दिवसीय सामना महत्त्वपूर्ण ठरेल.

स्पर्धेतील सुरवातीचे दोन्ही सामने जिंकलेल्या नागालँड व गोवा यांचे समान १३ गुण झाले आहेत. कोशंटमध्ये नागालँड (३.४२१) पहिल्या, तर गोवा (२.७८३) दुसऱ्या क्रमांकावर आहे. कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर होणाऱ्या लढतीत विजय नोंदविणारा किंवा अनिर्णित लढतीत आघाडी घेणारा संघ अव्वल स्थान मिळवेल.

पणजी जिमखान्यावर तब्बल १८ वर्षांनंतर रणजी करंडक सामना होत असल्यामुळे नूतनीकरण झालेल्या या मैदानावर दोन्ही संघांचा कस लागेल. नागालँडने मागील दोन्ही लढतीत मोठी धावसंख्या रचलेली असल्याने गोव्याच्या गोलंदाजांना पूर्ण क्षमतेने मारा करावाच लागेल. नागालँडचे पाहुणे खेळाडू गोव्याला भारी ठरू शकतात.

Ranji Cricket: रणजी प्लेट गटात वर्चस्वासाठी चुरस; गुणतालिकेत नागालँड अव्वल स्थानी तर गोवा दुसऱ्या स्थानी
Ranji Cricket Tournament: अर्जुन आणि दर्शन वाल्लोर रे तुमका! गोव्याने उडवला सिक्कीमचा धुव्वा; विजयाने संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान

अगोदरच्या लढतीत नागालँडने अरुणाचल प्रदेशवर डाव व २९० धावांनी, तर मणिपूरवर १४७ धावांनी विजय मिळविला. गोव्याने पर्वरी येथे मणिपूरला नऊ विकेटने, तर रंगपो येथे सिक्कीमला डाव व ५३ धावांनी हरविले.

Ranji Cricket: रणजी प्लेट गटात वर्चस्वासाठी चुरस; गुणतालिकेत नागालँड अव्वल स्थानी तर गोवा दुसऱ्या स्थानी
Ranji Cricket Tournament: अर्जुन तेंडुलकरसह हेरंब, शुभमचा भेदक मारा, सुयश आणि रोहणचं 'तूफान'; सिक्कीमचा संघ पत्त्यासारखा कोसळला !

लक्षय गर्गचा संघात समावेश

नागालँडविरुद्ध सामन्यासाठी गोव्याच्या संघात सतरावा खेळाडू म्हणून अनुभवी गोलंदाज लक्षय गर्ग याचा समावेश करण्यात आल्याची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे देण्यात आली. मणिपूर व सिक्कीमविरुद्ध निवडलेल्या सामन्यांसाठी तो संघात नव्हता. २९ वर्षीय लक्षय ३३ रणजी करंडक सामने खेळला असून त्याने ९४ गडी बाद केले आहेत.

गोव्याचा संघ: सुयश प्रभुदेसाई, रोहन कदम, मंथन खुटकर, स्नेहल कवठणकर, के. व्ही. सिद्धार्थ, कश्यप बखले, समर दुभाषी (यष्टिरक्षक), दर्शन मिसाळ (कर्णधार), मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकर, हेरंब परब, शुभम तारी, ऋत्विक नाईक, दीपराज गावकर, राहुल मेहता, कीथ पिंटो, लक्षय गर्ग.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com