Syed Mushtaq Ali Trophy T20 Cricket Tournament Canva
गोंयचें खेळामळ

Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याची पहिली लढत बलाढ्य मुंबईविरुद्ध! टी-20 चा रंगणार थरार

Syed Mushtaq Ali Trophy T20 Cricket Tournament: ई गटात गोव्यासह मुंबई, सेनादल, आंध्र, केरळ, महाराष्ट्र व नागालँड या संघांचा समावेश आहे. पहिली लढत बलाढ्य मुंबईविरुद्ध होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Syed Mushtaq Ali Trophy T20 Cricket Tournament Goa Matches

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ई गटातील गोव्याची मोहीम शनिवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. या गटातील सामने हैदराबाद येथे होतील. गटात प्रतिस्पर्धी बलवान असल्याने दीपराज गावकर याच्या नेतृत्वाखालील संघाला नागालँड वगळता अन्य पाच लढतीत खूपच घाम गाळावा लागण्याचे संकेत आहेत.

ई गटात गोव्यासह मुंबई, सेनादल, आंध्र, केरळ, महाराष्ट्र व नागालँड या संघांचा समावेश आहे. पहिली लढत शनिवारी बलाढ्य मुंबईविरुद्ध होईल. अखेरचा साखळी सामना पाच डिसेंबर रोजी नागालँडविरुद्ध खेळला जाईल.

रणजी करंडक प्लेट विभागात सलग पाच सामने जिंकल्यानंतर आता गोव्याचा टी-२० स्पर्धेत कस लागेल. झटपट प्रकारच्या या स्पर्धेत दीपराज संघाचे नेतृत्व करत असून रणजी संघ कर्णधार दर्शन मिसाळ निव्वळ खेळाडू या नात्याने खेळेल.

आयपीएल मेगा लिलावात स्थान मिळालेला संघाचा उपकर्णधार सुयश प्रभुदेसाई, अर्जुन तेंडुलकर यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. ईशान गडेकर, रोहन कदम, के. व्ही. सिद्धार्थ, कश्यप बखले, मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकर, शुभम तारी, हेरंब परब, फेलिक्स आलेमाव, विकास सिंग, शिवेंद्र भुजबळ, विजेश प्रभुदेसाई हे संघातील अन्य खेळाडू आहे.

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ आतापर्यंत ८९ सामने खेळला असून ३१ विजय व ५८ पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. गतमोसमातील स्पर्धेत गोव्याने सात लढतीत चार विजय नोंदविले होते, तर तीन पराभव पत्करले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT