Syed Mushtaq Ali Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Syed Mushtaq Ali Trophy: अभिनवचा धडाका, पण गोवा पराभूत; टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशचा सहा विकेटने विजय

Goa vs Uttar Pradesh Match: अभिनव तेजराणा याने धडाकेबाज अर्धशतक नोंदविले; पण तो सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच सामन्यात गोव्याचा पराभव टाळू शकला नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अभिनव तेजराणा याने धडाकेबाज अर्धशतक नोंदविले; पण तो सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच सामन्यात गोव्याचा पराभव टाळू शकला नाही. बुधवारी कोलकात्यातील जादवपूर विद्यापीठ मैदानावर झालेल्या लढतीत त्यांना उत्तर प्रदेशने सहा विकेट राखून हरविले.

एलिट ब गट लढतीत उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून गोव्यास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अभिनवने अवघ्या ३५ चेंडूंत चार चौकार व सहा षटकारांसह तुफानी ७२ धावा केल्या, त्यामुळे गोव्याने ९ बाद १७२ धावा केल्या. अभिनवने सलामीस बढती दिलेल्या अर्जुन तेंडुलकर (२८) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली.

यष्टिरक्षक-फलंदाज आर्यन जुयाल याच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर उत्तर प्रदेशने १८.२ षटकांत ४ बाद १७३ धावा करून सामना जिंकला. जुयाल याने नाबाद ९३ धावांच्या खेळीत ५७ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार व तीन षटकार मारले.

गोव्यातर्फे दीपराज गावकर याने छान मारा केला; परंतु इतर गोलंदाज निष्प्रभ ठरले. दीपराजने चार षटकांत १९ धावा देत दोन गडी बाद केले. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना चंडीगडविरुद्ध २८ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्सवर होईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ९ बाद १७२ (ईशान गडेकर १६, अर्जुन तेंडुलकर २८, अभिनव तेजराणा ७२, सुयश प्रभुदेसाई ५, ललित यादव २, दर्शन मिसाळ ४, राजशेखर हरिकांत १२, विकास सिंग नाबाद २१, दीपराज गावकर २, शुभम तारी १, वासुकी कौशिक नाबाद ०, भुवनेश्वर कुमार ४-०-२३-२, शिवम मावी

४-०-२४-३) पराभूत वि. उत्तर प्रदेश : १८.२ षटकांत ४ बाद १७३ (आर्यन जुयाल नाबाद ९३, प्रियम गर्ग २८, समीर रिझवी ३८, वासुकी कौशिक ४-०-३०-२, अर्जुन तेंडुलकर २.२-०-२९-०, शुभम तारी २-०-३३-०, दर्शन मिसाळ

३-०-२५-०, दीपराज गावकर ४-०-१९-२, विकास सिंग २-०-१७-०, ललित यादव १-०-१८-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT