UTT National Ranking Table Tennis Championship 2024
पणजी: यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आशियाई महिला दुहेरी ब्राँझपदक विजेती सुतिर्था मुखर्जी हिने महिला एकेरीत, तर अंकुर भट्टाचारजी याने पुरुष एकेरीत विजेतेपद पटकावले. नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली.
दरम्यान, सुतिर्था हिने महिला एकेरीतील अंतिम लढतीत यशस्विनी घोरपडे हिला 11-7, 5-11, 11-6, 9-11, 11-5, 11-3 फरकाने पराभूत केले. कांगरा येथे झालेल्या यापूर्वीच्या मानांकन स्पर्धेत यशस्विनी हिने विजेतेपद मिळवले होते, मात्र सुतिर्थाला अनुभव गोव्यात भारी ठरला. पुरुष गटात जेतेपद पटकावताना अंकुर याने रोनित भांजा याला 11-7, 11-5, 12-10, 13-11 असे नमवले.
तसेच, पुरुषांच्या उपांत्य फेरीत आरएसपीबीच्या रोनित याने संघसाथी अनिरबन घोष याच्यावर 10-12, 12-10, 8-11, 11-6, 12-10, 8-11, 11-3 अशी, तर पीएसपीबीच्या अंकुरने दिल्लीच्या यशांश मलिक याच्यावर 9-11, 11-9, 11-8, 11-7, 6-11, 11-7 अशी मात केली होती. महिला एकेरीत आगेकूच राखताना उपांत्य लढतीत पीएसपीबीच्या यशस्विनीने महाराष्ट्राच्या जेनिफर व्हर्गिस हिला 11-8, 11-7, 11-6, 11-8 असे, तर आरएसपीबीच्या सुतिर्थाने महाराष्ट्राच्या तनिशा कोटेचा हिला 11-8, 10-12, 11-8, 11-4, 7-11, 11-2 असे नमवले होते.
फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी, गोवा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुदिन वेरेकर, उपाध्यक्ष विक्रम वेर्लेकर, संयुक्त सचिव नीलेश कीर्तनी, सदस्य कबिर पिंटो मखिजा यांची उपस्थिती होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.