Table Tennis Championship: देशातील स्टार टेनिसपटू गोव्यात खेळणार; यूटीटी राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत दाखवणार जलवा

UTT National Ranking Table Tennis Championship 2024: स्पर्धेत आतापर्यंत १२ गटात २६०० प्रवेशिका सादर झाल्या असून सुमारे १७०० खेळाडू भाग घेणार आहेत.
Table Tennis Championship: देशातील स्टार टेनिसपटू गोव्यात खेळणार; यूटीटी राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत दाखवणार जलवा
Ahayika Mukherjee Sutirtha Mukherjee Dainik Gomantak
Published on
Updated on

UTT National Ranking Table Tennis Championship 2024

पणजी: भारताचा टेबल टेनिसमधील प्रमुख खेळाडू जी. साथियन, महिला दुहेरीतील अव्वल जोडी अहयिका मुखर्जी व सुतिर्था मुखर्जी, तसेच मानव ठक्कर यांनी नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये शुक्रवारपासून (ता. १८) सुरू होणाऱ्या यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सहभाग पक्का केला आहे.

स्पर्धेत आतापर्यंत १२ गटात २६०० प्रवेशिका सादर झाल्या असून सुमारे १७०० खेळाडू भाग घेणार आहेत. मुला व मुलींच्या गटातील ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील,१७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, तसेच पुरुष व महिला गटात १८ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत चुरस अनुभवायला मिळेल. या आठ दिवसीय स्पर्धेत गोव्यातील जवळपास ५० खेळाडू भाग घेतील, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.

Table Tennis Championship: देशातील स्टार टेनिसपटू गोव्यात खेळणार; यूटीटी राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत दाखवणार जलवा
Table Tennis Championships मध्ये भारताने केला जर्मनीचा 3-1 ने पराभव

क्रीडामंत्री गोविंद गावडे, भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सचिव कमलेश मेहता, क्रीडा संचालक अरविंद खुटकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर, गोवा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुदिन वेरेकर, सचिव ख्रिस्तोफर मिनेझिस यांच्या उपस्थितीत १८ रोजी सकाळी दहा वाजता स्पर्धेचे उद्‍घाटन होईल.

या खेळाडूंचे आकर्षण

साथियन व मानव यांच्यासह मानुष शाह, जीत चंद्रा, अमल राज, पायस जैन हे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पुरुष टेबल टेनिसपटू नावेलीत होणाऱ्या स्पर्धेत खेळतील. हल्लीच कझाकस्तानमधील अस्ताना येथे अहयिका व सुतिर्था यांनी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत ऐतिहासिक ब्राँझपदकाची कमाई केली होती. त्यामुळे या दोघी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतील. याशिवाय दिया चितळे, बैस्या पोयमांती, प्रिथा वर्टीकर, सायली वाणी, यशस्विनी घोरपडे यांचा सहभागही उल्लेखनीय असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com