FC Goa Super Club 2025 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

FC Goa Super Club 2025: ईस्ट बंगालतर्फे महंमद बासीम राशीद याने चौथा, तर पी. व्ही. विष्णू याने सातवा फटका गोलपट्टीवरून मारल्यामुळे कोलकात्याच्या संघाला दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: निर्धारित ९०, तसेच अतिरिक्त ३० मिळून एकूण १२० मिनिटांच्या खेळात गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिल्यानंतर यावेळच्या सुपर कप फुटबॉल विजेता पेनल्टी शूटआऊटवर ठरला. एफसी गोवाने सलग दुसऱ्यांदा आणि एकंदरीत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविताना ईस्ट बंगालला ६-५ फरकाने हरविले.

अंतिम सामना रविवारी रात्री फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये बोर्हा हेर्रेरा याचा पहिलाच फटका गोलपट्टीस आपटल्यानंतर हावियर सिव्हेरियो, देयान द्राझिच, मुहम्मद नेमिल, डेव्हिड तिमोर, उदांता सिंग व साहिल ताव्होरा या एफसी गोवाच्या बाकी खेळाडूंनी अचूक नेम साधला.

ईस्ट बंगालतर्फे महंमद बासीम राशीद याने चौथा, तर पी. व्ही. विष्णू याने सातवा फटका गोलपट्टीवरून मारल्यामुळे कोलकात्याच्या संघाला दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांच्या केविन सिबिल, सॉल क्रेस्पो, मिगेल फेरेरा, अन्वर अली व हमीद अहादाद यांनी नेम चुकविला नाही.

सुपर कप विजेतेपदामुळे एफसी गोवा संघ सलग दुसऱ्यांदा पुढील मोसमातील (२०२५-२६) एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरला आहे.

सामन्याच्या ७४व्या मिनिटास ईस्ट बंगालने जवळपास आघाडी घेतली होती, पण एफसी गोवाचा गोलरक्षक ऋत्विक तिवारी याची समयसूचकता अफलातून ठरली. ईस्ट बंगालचा बदली खेळाडू पी. व्ही. विष्णू मारलेल्या फटक्यावर अडवलेला चेंडू ऋत्विकच्या हातून सुटला, पण या गोलरक्षकाने स्वतःला वेळीच सावरत पुन्हा मागे धाव घेत गोलरेषेवरून चेंडूला गोलनेटमध्ये जाण्यापासून रोखले.

त्यानंतर एफसी गोवाने आघाडीसाठी वारंवार प्रयत्न केले, पण दिशा अचूक ठरली नाही. ब्रायसन फर्नांडिसचा फटका गोलपोस्टला आपटला, तर प्रतिस्पर्धी गोलरक्षक जाग्यावर नसताना देयान द्राझिच याचा हेडर दिशाहीन ठरला.

८१व्या मिनिटास एफसी गोवाच्या पोल मोरेनो याने आपल्या गोलक्षेत्रातून लांबलचक फटका गोलपोस्टच्या दिशेने मारला. चेंडू गोलनेटमध्ये उतरत अताना ईस्ट बंगालचा गोलरक्षक प्रभसुखनसिंग गिल याने वेळीच चेंडू पकडला.

सामन्याच्या अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांनी गोलसाठी वारंवार प्रयत्न केले. १०७व्या मिनिटास एफसी गोवास संधीचा लाभ घेता आला नाही. द्राझिचच्या फटक्यावर अडवलेला चेंडू गोलरक्षक गिल याच्या हातून सुटला, त्यावेळी रिबाऊंडवर हावियर सिव्हेरियो याला नामी संधी होती, परंतु गोलरक्षक गिलने वेळीच स्वतःला सावरत चेंडू ऐनवेळी ताब्यात घेतला.

गोव्यातील संघाचा पराक्रम

सुपर कप सलग दुसऱ्यांदा जिंकणारा एफसी गोवा पहिला संघ

यापूर्वी एफसी गोवास २०१९ व २०२४-२५ मध्ये विजेतेपद

सुपर कप सर्वाधिक तीन वेळा जिंकणारा एफसी गोवा एकमेव संघ

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा दुसऱ्यांदा विजेते

ईस्ट बंगालला दुसऱ्यांदा सुपर कप स्पर्धेत उपविजेतेपद

कोलकात्यातील संघ २०१८ मध्ये अंतिम लढतीत पराभूत

ईस्ट बंगाल संघ २०२४ मध्ये सुपर कपमध्ये विजेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंडोनेशिया हादरलं! जकार्तामधील सात मजली इमारतीला भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VEDIO

Goa Politics: 'आमच्या उमेदवारांची चिंता तुम्हाला का?' सत्ताधारी भाजपला आपने डिवचले

Viral Video: 19 मिनिटांचा 'तो' व्हायरल व्हिडिओ शेअर कराल तर याद राखा, पोलिसांनी दिली तंबी; काय आहे नेमकं प्रकरण?

'रोमिओ लेन'वर बुलडोझर ॲक्शन! मालक फरार होताच CM सावंतांचे फर्मान, पाडकाम पथके सज्ज; कोणत्याही क्षणी होणार भुईसपाट

VEDIO: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की..! लंडनमध्ये गृहमंत्र्यांची गाडी अडकून पोलिसांनी केली तपासणी; काय नेमकं घडलं?

SCROLL FOR NEXT