Super Cup FC Goa Dainik Gomatank
गोंयचें खेळामळ

Super Cup 2025: गतविजेत्या FC Goa चा विजय! जमशेदपूर एफसीला नमविले; सिव्हेरियोचा भेदक गोल

FC Goa Vs Jamshedpur FC: एफसी गोवाने सुपर कप राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना रविवारी रात्री भर पावसात गतउपविजेत्या जमशेदपूर एफसीला २-० फरकाने नमविले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवाने सुपर कप राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना रविवारी रात्री भर पावसात गतउपविजेत्या जमशेदपूर एफसीला २-० फरकाने नमविले. ‘ब’ गटातील अन्य लढतीत इंटर काशी एफसीने बलाढ्य नॉर्थईस्ट युनायटेडला पिछाडीवरून २-२ असे गोलबरोबरीत रोखले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवासाठी हावियर सिव्हेरियो याने पहिला गोल केला. स्पॅनिश खेळाडूने गतमोसमात खेळलेल्या संघाविरुद्ध ४५व्या मिनिटास भेदक हेडिंगवर गोल केला. डेव्हिड तिमोरचा हेडर क्रॉसबारला आपटल्यानंतर रिबाऊंडवर सर्बियन देयान द्राझिच याने एफसी गोवास ६६व्या मिनिटास २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. विजयामुळे एफसी गोवाच्या खाती तीन गुण जमा झाले.

बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर रविवारी संध्याकाळी इंटर काशीने बलाढ्य नॉर्थईस्ट युनायटेडला चकीत केले. हरमनप्रीत सिंग याने पाचव्याच मिनिटास गोल केल्यामुळे आय-लीग विजेत्यांना आघाडी मिळाली. मोरोक्कन अलाएद्दीन अजारेई याने १८व्या मिनिटास दोन वेळच्या ड्युरँड कप विजेत्या नॉर्थईस्ट युनायटेडला बरोबरी साधून दिली.

४०व्या मिनिटास स्पॅनिश मिगेल झाबाको याने हेडिंगवर केलेल्या गोलमुळे गुवाहाटीस्थित संघ विश्रांतीला २-१ असा आघाडीवर होता. ७४व्या मिनिटास कार्तिक पानिकर याच्या गोलमुळे इंटर काशीने बरोबरी साधली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण विभागून मिळाला. ब गटातील पुढील लढतीत २९ रोजी जमशेदपूर एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात, तर एफसी गोवा व इंटर काशी एफसी यांच्यात लढत होईल.

पावसामुळे उत्तरार्ध लांबला

जोरदार पावसामुळे फातोर्डा येथे एफसी गोवा आणि जमशेदपूर एफसी यांच्यातील सामन्यात उत्तरार्ध सुरू होण्यास २४ मिनिटे उशीर झाला. पावसाची संततधार सुरू असताना सामन्यास सुरवात झाली, मैदानावर भरपूर पाणी साचल्यामुळे चेंडूवर ताबा राखताना दोन्ही संघांतील खेळाडूंना त्रास झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT