पणजी: गोव्याच्या युवक संघाने २३ वर्षांखालील स्टेट ए करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना आसामला तीन विकेट राखून हरविले, एलिट ब गट सामना मंगळवारी बडोदा येथील कोटंबी स्टेडियमवर झाला.
गोव्याने नाणेफेक जिंकून आसामला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. अनुज यादव (४-२२), कुचबुदिन जमादार (३-२६) यांच्या प्रभावी माऱ्याच्या बळावर गोव्याने आसामचा २१५ धावांत गुंडाळले.
त्यानंतर अर्धशतकवीर सनथ नेवगी (८५ धावा, ६३ चेंडू, ९ चौकार, ५ षटकार) याचे सलग दुसरे अर्धशतक, तसेच त्याने जीवनकुमार चित्तेम (७१ धावा, ९० चेंडू, ६ चौकार, २ षटकार) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १०२ धावांच्या भागीदारीमुळे गोव्याच्या विजयाचा पाया भक्कम झाला, मात्र २० धावांत तीन विकेट गमावल्यामुळे गोव्याची ५ बाद १६८ अशी घरसण झाली, मात्र जीवन याने किल्ला लढविल्यामुळे विजय निसटला नाही. गोव्याला या लढतीतून विजयामुळे चार गुण मिळाले. त्यांना पहिल्या सामन्यात ओडिशाने नमविले होते.
आसाम : ४२.४ षटकांत सर्वबाद २१५ (रोहित सेन ३१, सुमीत कश्यप ३२, रोशन टोपनो ५३, मयुख हझारिका ३७, लखमेश पावणे ६-१-३८-१, कौस्तुभ पिंगुळकर ६-०-६०-१, अनुज यादव ९.४-१-२२-४, कुतबुदिन जमादार ७-१-२६-३, मनीष काकोडे १०-०-४७-१, अमन धूपर ४-०-२१-०) पराभूत गोवा : ३८.५ षटकांत ७ बाद २१६ (वीर यादव १६, सनथ नेवगी ८५, जीवनकुमार चित्तेम ७१, आर्यन नार्वेकर १२, अमन धूपर ०, लखमेश पावणे ५, शिवेंद्र भुजबळ नाबाद १४, कुतबुदिन जमादार २, अनुज यादव नाबाद २, सौरव डे २-३७, रोनित अख्तर २-६).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.