GCA Premier League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA Premier League: वेगवान शुभम तारीचे पर्वरीत 'तुफान', डावात सहा गडी टिपले; 'चौगुले'समोर 'एमसीसी'चे नमते

Chaugule Sports Club vs MCC: अवघ्या ३८ धावांत ६ गडी टिपलेल्या वेगवान शुभम तारी याचे तुफान शुक्रवारी सकाळी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर घोंघावले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अवघ्या ३८ धावांत ६ गडी टिपलेल्या वेगवान शुभम तारी याचे तुफान शुक्रवारी सकाळी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर घोंघावले, परिणामी मडगाव क्रिकेट क्लबला (एमसीसी) पहिल्या डावात १०१ धावांत नमते घ्यावे लागले. त्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात चौगुले स्पोर्टस क्लबने १४५ धावांची आघाडी घेत पहिल्याच दिवशी पकड बसविली. चौगुले क्लबने पहिल्या डावात २४६ धावा केल्यानंतर एमसीसी संघाने दिवसअखेर बिनबाद ५ धावा केल्या.

स्पर्धेतील अन्य एका सामन्यात कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर पणजी जिमखान्याचा पहिला डाव १४३ धावांत गुंडाळल्यानंतर धेंपो क्रिकेट क्लबने पहिल्या दिवसअखेर ३ बाद १३७ धावा केल्या. त्यांना आघाडीसाठी फक्त सात धावांची गरज आहे.

संक्षिप्त धावफलक

१) मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव ः २९.५ षटकांत सर्वबाद १०१ (दीपराज गावकर २४, शुभम तारी ९.५-२-३८-५, दर्शन मिसाळ ३-४२) व दुसरा डाव ः २ षटकांत बिनबाद ५ विरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः ५३.४ षटकांत सर्वबाद २४६ (गौरेश कांबळी ५०, शुभम देसाई ४९, दर्शन मिसाळ ४६, शुभम तारी २१, हेरंब परब २-५१, अनुज यादव ३-५७, रुद्रेश शर्मा ४-६८).

२) पणजी जिमखाना, पहिला डाव ः ४४.५ षटकांत सर्वबाद १४३ (सोहम पानवलकर ५१, आफ्रिद २७, समीत आर्यन मिश्रा २-२४, मोहित यादव ४-४६, अभिनव तेजराणा ३-१२) विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः ३८ षटकांत ३ बाद १३७ (आदित्य कोटा नाबाद ४२, अभिनव तेजराणा २१, स्नेहल कवठणकर नाबाद ६०, विजेश प्रभुदेसाई ३-४६).

३) साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव ः ७७ षटकांत ८ बाद ३५१ घोषित (अझान थोटा ४४, रिजुल पाठक ३२, शंतनू नेवगी ४९, यश कसवणकर १२१, पियुष यादव ३९, समर्थ राणे २-५५, विकास सिंग २-८४, पुंडलिक नाईक २-४६, निहाल सुर्लकर २-२६) विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः ३ षटकांत बिनबाद ११.

कसवणकरचे पुन्हा शतक

गोव्याचा उदयोन्मुख अष्टपैलू यश कसवणकर याची बॅट हरवळे-साखळी येथील नॅपेक्स मैदानावर शुक्रवारी पुन्हा एकदा कडाडली. त्याने जीनो स्पोर्टस क्लबविरुद्ध यंदा या स्पर्धेतील दुसरे शतक पूर्ण करताना सर्वप्रथम पाचशे धावा पूर्ण करण्याची किमयाही साधली.

साळगावकर क्लबने पहिला डाव ८ बाद ३५१ धावांवर घोषित केल्यानंतर दिवसअखेर जीनो क्लबने बिनबाद ११ धावा केल्या. यश याने १५५ चेंडूंत १४ चौकार व दोन षटकारांसह १२१ धावा केल्या. यापूर्वी त्याने पणजी जिमखान्याविरुद्ध १९१ धावांची खेळी केली होती. यश याने आता स्पर्धेत पाच सामन्यांतील सात डावांत ५०४ धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT