Shikha Pandey goa X
गोंयचें खेळामळ

Shikha Pandey: गोमंतकीय शिखाचा 'डब्ल्यूपीएल'मध्ये डंका! 11 विकेट्स पटकावून चमकदार कामगिरी; परदेशी लीगमध्येही छाप

Shikha Pandey Goa Cricketer: हिला कसोटी क्रिकेट खेळलेली एकमेव गोमंतकीय शिखा पांडे हिने नुकत्याच संपलेल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) स्पर्धेत धारदार मारा केला.

Sameer Panditrao

पणजी: महिला कसोटी क्रिकेट खेळलेली एकमेव गोमंतकीय शिखा पांडे हिने नुकत्याच संपलेल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) स्पर्धेत धारदार मारा केला. सलग तिसऱ्या वर्षी तिने दिल्ली कॅपिटल्ससाठी गोलंदाजीची धुरा वाहताना यंदा अकरा गडी बाद करून छाप पाडली.

दिल्ली कॅपिटल्स (डीसी) संघाला स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत दिल्ली संघाला मुंबई इंडियन्सकडून आठ धावांनी पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सच्या स्पर्धेतील सर्व नऊही सामन्यांत शिखा खेळली. तिने ७.०८च्या इकॉनॉमी रेटने गडी बाद केले. एकंदरीत तीन डब्ल्यूपीएल स्पर्धांत तिने ३० गडी बाद केले आहेत. दिल्लीतर्फे यावेळच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज जेस जोनासेन हिने १३, तर शिखाने ११ गडी बाद केले.

शिखा सध्या भारतीय सीनियर महिला संघाची सदस्य नसली, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. वयाच्या ३५ व्या वर्षीही तिच्या गोलंदाजीतील भेदकता कायम असल्याचे यावेळच्या ‘डब्ल्यूपीएल’ स्पर्धेतील कामगिरीने सिद्ध झाले. ‘‘डीसी रंगात (जर्सीत) पुन्हा खेळताना खूप छान वाटते,’’ असे मनोगत शिखाने यावेळची ‘डब्ल्यूपीएल’ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्यक्त केले होते.

परदेशातील लीगमध्येही छाप

शिखाने भारतातील‘डब्ल्यूपीएल’ स्पर्धेव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियातील वूमन्स बिग बॅश लीगमध्ये (डब्ल्यूबीबीएल) ब्रिस्बेन हिट संघाचे, तर वेस्ट इंडीजमधील वूमन्स कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूसीपीएल) त्रिनबागो नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले. २०२४-२५ मोसमात तिने वूमन्स बिग बॅश लीगमधील १२ सामन्यांत १२ विकेट, तर कॅरिबियन लीगमधील पाच सामन्यांत चार गडी बाद केले होते.

डब्ल्यूपीएल स्पर्धेतील शिखाची गोलंदाजी

वर्ष सामने डाव विकेट सर्वोत्तम इकॉनॉमी

२०२३ ९ ९ १० ३-२३ ६.५९

२०२४ ९ ९ ९ २-२३ ७.१७

२०२५ ९ ९ ११ २-१४ ७.०८

एकूण २७ २७ ३० ३-२३ ६.९६

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT