Colonel CK Nayudu Trophy Under 23 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

CK Nayudu Trophy: गोव्याचा नवा शतकवीर! 'शंतनू'चे शानदार शतक! जम्मू काश्मीरविरुद्ध सावरला डाव

Goa vs Jammu Kashmir: शंतनू नेवगी याने प्रेक्षणीय शतक नोंदवून कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला जम्मू-काश्मीरविरुद्ध सावरले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शंतनू नेवगी याने प्रेक्षणीय शतक नोंदवून कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला जम्मू-काश्मीरविरुद्ध सावरले. त्याच्या १०४ धावांच्या खेळीमुळे संघाला पहिल्या दिवशी २८६ धावा करता आल्या.

जम्मू येथील हॉस्टेल मैदानावर शुक्रवारपासून एलिट अ गटातील चार दिवसीय सामन्याला सुरवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर यजमान संघाने दोन षटकांत बिनबाद १० धावा केल्या होत्या. गोव्याच्या पहिल्या डावात शंतनूने निवड सार्थ ठरविली. यंदा १९ वर्षांखालील वयोगटात लक्षवेधक ठरलेल्या या युवा फलंदाजाने वरच्या वयोगटात शतकाचा मान मिळविताना १३१ चेंडूंतील खेळीत १८ चौकार लगावले.

त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोव्याला पावणेतीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. शंतनूने वैयक्तिक शतकी खेळीत दोन अर्धशतकी भागीदारीही नोंदविल्या. दुसऱ्या विकेटसाठी त्याने आदित्य कोटा (२०) याच्यासमवेत ५६ धावांची भागीदारी केली, नंतर शंतनूने पाचव्या विकेटसाठी जीवनकुमार चित्तेम (४७, ७९ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) याच्यासमवेत ६५ धावांची भागीदारी केली.

दिशांक मिस्कीन ४९ धावांवर नाबाद राहिला. त्याने संयमी खेळीत १०८ चेंडूंचा सामना करताना सात चौकार मारले. त्याच्या चिवट फलंदाजीमुळे गोव्याला धावसंख्या वाढविणे शक्य झाले. जम्मू-काश्मीरतर्फे विशाल कुमार याने ९० धावांत ६ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ८५.५ षटकांत सर्वबाद २८६ (आदित्य कोटा २०, सार्थक भिके ०, शंतनू नेवगी १०४, यश कसवणकर ५, कौशल हट्टंगडी २२, जीवनकुमार चित्तेम ४७, दिशांक मिस्कीन नाबाद ४९, अनुज यादव ३, मनीष काकोडे ३, समर्थ राणे ११, सुजय नाईक ४, विशाल कुमार २८.५-७-९०-६, सर्वाशिष सिंग २९-०-६३-३).

जम्मू-काश्मीर, पहिला डाव २ षटकांत बिनबाद १०.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT