Football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Professional League: सेझा अकादमीचा विजयी धडाका, पिछाडीवरुन मारली मुसंडी; पणजी फुटबॉलर्सचा उडवला धुव्वा

Seza vs Panaji Footballers: सेझा फुटबॉल अकादमीने शानदार गोल धडाका प्रदर्शित करताना गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत दुबळ्या पणजी फुटबॉलर्सचा ७-१ फरकाने धुव्वा उडविला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सेझा फुटबॉल अकादमीने शानदार गोल धडाका प्रदर्शित करताना गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत दुबळ्या पणजी फुटबॉलर्सचा ७-१ फरकाने धुव्वा उडविला. आणखी एका सामन्यात पॅक्स ऑफ नागोवा क्लबने चर्चिल ब्रदर्सला ३-१ असे नमविले.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर पी. बी. बेनविन याने सातव्या मिनिटास पणजी फुटबॉलर्सला आघाडी मिळवून दिली. पिछाडीवरून नंतर सेझा अकादमीने सचिदानंद साटेलकर याच्या हॅटट्रिकच्या बळावर सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. सचिदानंद याने अनुक्रमे ९ व्या, ४५+३, तसेच ४८व्या मिनिटास गोल नोंदविला.

याशिवाय सॅव्हलन फर्नांडिस (८वे मिनिट), महंमद फाहीझ (३४ वे मिनिट-पेनल्टी), बदली खेळाडू क्लेन्सियो पिंटो (७४ वे मिनिट) व आणखी एक बदली खेळाडू ओमकार शेटगावकर (८८वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सेझा अकादमीचा आता ११ सामन्यांतून २१ गुण झाले असून पणजी फुटबॉलर्सच्या खाती एक गुण कायम राहिला. त्यांचा हा दहावा पराभव ठरला.

नागोवा पंचायत मैदानावर झालेल्या लढतीत पॅक्स ऑफ नागोवाच्या विजयात शुबर्ट परेरा (३६ व ६३वे मिनिट) याने दोन, तर बेनेस्टन बार्रेटो (२६वे मिनिट-पेनल्टी) याने एक गोल केला. चर्चिल ब्रदर्सची पिछाडी ७१व्या मिनिटास रिचर्ड फर्नांडिसने कमी केली. पॅक्स ऑफ नागोवाचे ११ सामन्यांतून १६ गुण झाले आहेत. चर्चिल ब्रदर्सचे नऊ गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT