Rohit Sharma Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs SA 2nd ODI: हिटमॅन रचणार इतिहास? 41 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठणार नवा टप्पा; सचिन-विराटच्या स्पेशल क्लबमध्ये होणार सामील

Rohit Sharma Record: रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 41 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठेल.

Manish Jadhav

IND vs SA 2nd ODI: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. नुकत्याच रांची येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले, तर रोहित शर्माने दमदार अर्धशतकी खेळी खेळली. या अर्धशतकी खेळीदरम्यान रोहितने 3 जबरदस्त षटकार लगावत वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा शाहिद आफ्रिदीचा जागतिक विक्रमही मोडीत काढला.

आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना 3 डिसेंबर रोजी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आणखी एक मोठा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

रोहित शर्मा 20000 धावांच्या उंबरठ्यावर

रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 41 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठेल. जर रोहितने हे यश मिळवले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 20000 धावा पूर्ण होतील. 20 हजार धावांचा टप्पा पूर्ण करताच रोहित शर्मा हा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंच्या खास क्लबमध्ये सामील होईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा रोहित शर्मा हा भारताकडून (India) चौथा क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी, फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनीच हा विक्रम केला. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा आकडा पार करणारा रोहित शर्मा जगातील 14 वा फलंदाज बनेल.

एबी डिव्हिलियर्सला टाकणार मागे?

रोहितने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-20) मिळून आत्तापर्यंत 503 सामन्यांत 19,959 धावा केल्या आहेत. या धावांमध्ये 50 शतके आणि 110 अर्धशतकांचा समावेश आहे. जर दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 56 धावा केल्या, तर तो 20 हजार धावांचा टप्पा करण्यासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स यालाही मागे सोडेल. एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20014 धावा आहेत.

रांची येथील पहिल्या वनडे सामन्यात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम मोडल्यानंतर आता रायपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा 20 हजार धावांचा टप्पा कधी गाठतो, याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dharbandora: सफर गोव्याची! थंडीत रंगणारा धालोत्सव, मांडावर येणाऱ्या ‘रंभा; धारबांदोड्याच्या आठवणी

VIDEO: हवेत उडाली स्टंप! हर्षित राणाच्या चेंडूनं कॉन्वेची दाणादाण, जल्लोष करताना गिलकडे पाहून केला 'हा' इशारा; व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran Protest: इराणमध्ये संघर्षाचा भडका!! भारतीयांना तातडीने देश सोडण्याचे आदेश; परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली 'हाय-अलर्ट' अ‍ॅडव्हायझरी

Goa Assembly Elections 2027: गोव्यात भाजपचं 'मिशन 30'! फातोर्ड्यात सरदेसाईंना घेरण्याची तयारी; मायकल लोबोंचं सूचक विधान

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल'ला न्यायालयाचा मोठा दणका! पंचायत सचिवांनी दिलेला बांधकाम परवाना रद्द

SCROLL FOR NEXT