Rajat Patidar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Rajat Patidar: रिप्लेसमेंट प्लेयर म्हणून एन्ट्री, RCB साठी लगीन पुढं ढकललं... आता विराटला पहिलं जेतेपद जिंकून दिलं, रजत पाटीदारची रंजक कहाणी

RCB Captain Rajat Patidar Story: आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीची सर्वाधिक चर्चा होत आहे, परंतु कर्णधार रजत पाटीदारचे योगदान यात कमी नाही. त्याने अखेर इतक्या वर्षांपासून ट्रॉफीसाठी आसुसलेल्या संघाला चॅम्पियन बनवले.

Manish Jadhav

RCB Captain Rajat Patidar Story: 17 वर्षे आणि 18 आयपीएल हंगाम... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) ची प्रतीक्षा अखेर संपली. किंग कोहलीच्या आरसीबीने आयपीएलच्या इतिहासातील पहिली ट्रॉफी जिंकली. स्पर्धेच्या 18 व्या हंगामात 18 क्रमांकाची जर्सी घालणाऱ्या विराट कोहलीला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. सुरुवातीपासून एकाच संघाकडून खेळणाऱ्या या महान फलंदाजाचे स्वप्न पूर्ण झाले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुमारे 90 हजार प्रेक्षकांसमोर त्याने ट्रॉफी उचलली.

रजत पाटीदारची कमाल

दरम्यान, आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीची सर्वाधिक चर्चा होत आहे, परंतु कर्णधार रजत पाटीदारचे योगदान यात कमी नाही. त्याने अखेर इतक्या वर्षांपासून ट्रॉफीसाठी आसुसलेल्या संघाला चॅम्पियन बनवले. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो महत्त्वाच्या क्षणी शांत राहिला आणि गोलंदाजीत उत्कृष्ट बदल करत विरोधी संघावर दबाव आणला. जेव्हा आरसीबीने 190 धावा केल्या तेव्हा बहुतेक क्रिकेट पंडितांचे मत होते की पंजाबकडे 191 धावांचे लक्ष्य सहज गाठण्यासाठी मजबूत फलंदाजी आहे. तथापि, असे घडले नाही आणि रजत पाटीदारसारख्या हुशार कर्णधारामुळे आरसीबीला 6 धावांनी सामना जिंकण्यास मदत झाली.

आरसीबीचा आठवा कर्णधार

2025 च्या आयपीएल (IPL) मेगा लिलावापूर्वी जेव्हा आरसीबीने त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला नारळ दिला आला तेव्हा सर्वांना वाटले होते की विराट पुन्हा कर्णधारपद स्वीकारेल. तथापि, कोहलीने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला आणि रजत पाटीदारला संघाची कमांड देण्यात आली. आरसीबीच्या या निर्णयाने सर्वांनाच चकित केले. पाटीदार 2021 मध्ये संघात आला आणि त्यानंतर लवकरच कर्णधार बनला. तो फ्रँचायझीचा आठवा कर्णधार आहे.

2022 मध्ये शतक झळकावले

रजतने आतापर्यंत भारतासाठी 3 कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. आयपीएल 2022 मध्ये रजत चमकला. त्याने आयपीएल 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध शतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. मात्र त्याची अर्धशतकी खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

बदली खेळाडू म्हणून आरसीबीमध्ये सामील

रजत 2022 च्या आयपीएलमध्ये खेळणार नव्हता. लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. तो अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर त्याने 9 मे 2022 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान, त्याला आरसीबीकडून फोन आला. लवनीथ सिसोदिया जखमी झाला तेव्हा तो बदली खेळाडू म्हणून संघात सामील झाला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही.

आरसीबीसाठी लग्न पुढे ढकलण्यात आले

रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी 2022 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, "रजतचे लग्न 9 मे रोजी होणार होते. हा एक छोटासा समारंभ होणार होता. त्यासाठी मी इंदूरमध्ये एक हॉटेल देखील बुक केले होते. लग्न मोठ्या थाटामाटात होणार नव्हते, म्हणून आम्ही निमंत्रण पत्रिका छापल्या नव्हत्या. आम्ही मर्यादित पाहुण्यांसाठी हॉटेल बुक केले होते, परंतु त्याचा फोन आल्याने बुकिंग वाढवण्यात आले. आता आम्ही जुलैमध्ये समारंभ आयोजित करण्याचा विचार करत आहोत."

आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने रजतला 11 कोटी रुपयांत रिटेन केले. संघाने विराट कोहली आणि यश दयाल यांनाही रिटेन केले. रजतने 2024/25 च्या हंगामात मध्य प्रदेशला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेले, मात्र संघाला ट्रॉफी मिळवून देऊ शकला नव्हता. त्यानंतर त्याला आरसीबीचे कर्णधारपद मिळाले आणि आता संघाला चॅम्पियन बनवले. रजतने या हंगामात 15 सामने खेळून 312 धावा केल्या. आता तो नेहमीच आरसीबीला पहिला ट्रॉफी मिळवून देणारा कर्णधार म्हणून लक्षात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT