Goa Cricket News Canva
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: गोवा संघ विजयाच्या उंबरठ्यावर; कश्यपचे शानदार शतक, 182 धावांची अभेद्य भागीदारी

Goa VS Nagaland: चौथ्या विकेटसाठी केलेल्या १८२ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे गोव्याने रणजी करंडक क्रिकेट प्लेट विजेतेपदासाठीचा दावा भक्कम केला.

Sameer Panditrao

Ranji Trophy Goa VS Nagaland

पणजी: कश्यप बखले याचे नाबाद शतक, तसेच त्याने अर्धशतकी स्नेहल कवठणकर याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी केलेल्या १८२ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे गोव्याने रणजी करंडक क्रिकेट प्लेट विजेतेपदासाठीचा दावा भक्कम केला. नागालँडविरुद्ध सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी एकूण २८४ धावांची आघाडी प्राप्त केली.

पाच दिवसीय अंतिम सामना नागालँडमधील सोविमा येथे सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर गोव्याने दुसऱ्या डावात ३ बाद २२४ धावा केल्या. रणजी सामन्यात लागोपाठ दुसऱ्यांदा शतक नोंदविलेला कश्यप १०१ धावांवर नाबाद आहे. त्याने २१३ चेंडूंचा सामना करताना आठ चौकार लगावले. स्नेहल ७८ धावांवर खेळत आहे. त्याने १७४ चेंडूंतील संयमी खेळीत चार चौकार लगावले.

शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ४.५ षटकांत आणखी ११ धावांची भर टाकून नागालँडचा पहिला डाव २१६ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे गोव्याला ६० धावांची आघाडी मिळाली. मध्यमगती गोलंदाज हेरंब परब याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना ३० धावांत ५ गडी बाद केले.

दुसऱ्या डावात रोहन कदम (१६), सुयश प्रभुदेसाई (७), के. व्ही. सिद्धार्थ (०) लवकर बाद झाल्यामुळे गोव्याची ३ बाद ४२ अशी स्थिती झाली. त्यानंतर अरुणाचल प्रदेशविरुद्ध ६०६ धावांची रणजी स्पर्धेतील विक्रमी भागीदारी रचलेली कश्यप व स्नेहल याने नागालँडच्या गोलंदाजांना यशस्वी ठरू दिले नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः २७६

नागालँड, पहिला डाव (८ बाद २०५ वरून) ः ६६.५ षटकांत सर्वबाद २१६ (चेतन बिस्त नाबाद २६, हेरंब परब १२.५-१-३०-५).

गोवा, दुसरा डाव ः ८० षटकांत ३ बाद २२४ (रोहन कदम १६, सुयश प्रभुदेसाई ७, के. व्ही. सिद्धार्थ ०, स्नेहल कवठणकर नाबाद ७८, कश्यप बखले नाबाद १०१, नागाहो चिशी २-२९, जे. सुचित १-५०).

गोव्यासाठी संकटमोचक जोडी

मागील नोव्हेंबरमध्ये पर्वरी येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध रणजी प्लेट सामन्यात स्नेहल कवठणकर (नाबाद ३१४) व कश्यप बखले (नाबाद ३००) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६०६ धावांची विक्रमी अभेद्य भागीदारी केली होती. तोच फॉर्म कायम राखताना शनिवारी ही जोडी गोव्यासाठी संकटमोचक ठरली.

२६ वर्षीय कश्यपने तिसऱ्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात दुसऱ्यांदा शतकी वेस ओलांडली. २९ वर्षीय स्नेहलने ५९व्या रणजी सामन्यात १५ वे अर्धशतक नोंदविले. त्याने नऊ शतकेही ठोकली आहेत. नागालँडविरुद्ध पहिल्या डावात स्नेहलने ६३, तर कश्यपने नाबाद ७९ धावा केल्या होत्या.

२६ वर्षीय हेरंब परब (५-३०) याने नागालँडविरुद्ध गोव्यातर्फे डावात सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी नोंदविली. फेब्रुवारी २०२० मध्ये सोविमा येथेच फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकरने ३१ धावांत ५ गडी टिपले होते. हेरंबने १५व्या रणजी क्रिकेट सामन्यात प्रथमच डावात निम्मा संघ गारद करण्याची किमया साधली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT