darshan misal yash kasvankar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

goa vs vidarbha ranji trophy 2026: यश कसवणकर (नाबाद ५१, १७७ चेंडू, ४ चौकार) व दर्शन मिसाळ (५१, १०८ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) जोडीने जबरदस्त संयमाने फलंदाजी करत खिंड लढविली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: फलंदाजांची कमजोर कामगिरी कायम राहिल्यामुळे रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याभोवती विदर्भाचा संघ पकड घट्ट आवळत होता, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अनुभवी दर्शन मिसाळ आणि उदयोन्मुख यश कसवणकर जोडी एकत्र आली. या डावखुऱ्या फलंदाजांनी शतकी भागीदारी केल्यामुळे संघाला पहिल्या दिवसअखेर स्पर्धेत यंदा प्रथमच द्विशतक मजल मारता आली.

जामठा-नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर एलिट अ गट चार दिवसीय सामन्याला सोमवारपासून सुरवात झाली. जम्मू-काश्मीरविरुद्ध मागील लढतीत अनुक्रमे तीन व पाच गडी बाद केलेल्या मध्यमगती नचिकेत भुते याने गोव्याची स्थिती खराब केली होती. गोव्याचा डाव उपहापानंतर लगेच ६ बाद ८४ धावा असा गडगडला होता.

मात्र यश कसवणकर (नाबाद ५१, १७७ चेंडू, ४ चौकार) व दर्शन मिसाळ (५१, १०८ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) जोडीने जबरदस्त संयमाने फलंदाजी करत खिंड लढविली. त्यांनी सातव्या विकेटसाठी २४८ चेंडूंत १०४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिवसअखेर गोव्याला ८ बाद २०४ धावा करता आल्या. तिसराच रणजी करंडक सामना खेळणाऱ्या कसवणकर याने दुसरे रणजी करंडक अर्धशतक पूर्ण केले. दिवसातील पाच षटके बाकी असताना दर्शन बाद झाल्यामुळे गोव्याला धक्का बसला. पार्थ रेखडेच्या गोलंदाजीवर त्याला अक्षय वाडकर याने यष्टिचीत बाद केले. ३४ वर्षीय दर्शनने ८७ व्या रणजी करंडक सामन्यात २४ वे अर्धशतक नोंदविले.

स्नेहलचे चार डावांत तीन‘भोपळे’

गोव्याचा (Goa) अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर याची बॅट बडोद्याविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक केल्यानंतर कमालीची रुसली आहे. हा तीस वर्षीय फलंदाज चार डावांत तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. पाच डावांत त्याने फक्त ५७ धावा केल्या असून गोव्यासाठी ही बाब खूपच चिंताजनक ठरली आहे.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ८६ षटकांत ८ बाद २०४ (सुयश प्रभुदेसाई १, शिवेंद्र भुजबळ ०, मंथन खुटकर १६, अभिनव तेजराणा ३०, स्नेहल कवठणकर ०, ललित यादव २२, यश कसवणकर नाबाद ५१, दर्शन मिसाळ ५१, ऋत्विक नाईक ६, वासुकी कौशिक नाबाद ४, हर्ष दुबे १८-३-४७-१, नचिकेत भुते १८-४-४०-४, यश ठाकूर १५-३-३५-०, रजनीश गुरबानी १७-७-२८-२, पार्थ रेखडे १५-३-३१-१, अमन मोखाडे ३-१-४-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Scrub Typhus Spread In goa: गोव्यात 'स्क्रब टायफस'चा धोका वाढला! 827 जण बाधित; तिसवाडी, मुरगावात सर्वाधिक रुग्ण

Sarmanas Villagers Protest: ‘वेदान्ता’ची खनिज वाहतूक रोखली! सारमानसवासीय पुन्हा आक्रमक; चार तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT