ranji trophy elite group match goa vs uttar pradesh Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात गोव्याची पिछाडी; पण फिरकीपटूंच्या जोरदार माऱ्यामुळे सामना अजूनही रंगतीत!

ranji trophy elite group match goa vs uttar pradesh: प्रमुख फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केल्यामुळे उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला पहिल्या डावात पिछाडीवर राहावे लागले, मात्र नंतर फिरकी गोलंदाजांनी खेळपट्टीस अनुरुप प्रभावी मारा केल्यामुळे त्यांचे आव्हान कायम राहिले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: प्रमुख फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केल्यामुळे उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला पहिल्या डावात पिछाडीवर राहावे लागले, मात्र नंतर फिरकी गोलंदाजांनी खेळपट्टीस अनुरुप प्रभावी मारा केल्यामुळे त्यांचे आव्हान कायम राहिले.

चार दिवसीय एलिट अ गट सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या पहिल्या डावातील २०२ धावांना उत्तर देताना गोव्याचा पहिला डाव सकाळी बिनबाद ६१ वरून १६४ धावांत संपुष्टात आला. पहिल्या दिवसअखेर त्यांनी बिनबाद ४३ धावा केल्या होत्या. उत्तर प्रदेशचा २६ वर्षीय लेगस्पिनर झीशान अन्सारी याने प्रथम श्रेणी कारकिर्दीत प्रथमच डावात पाच गडी (५-४५) बाद करण्याची किमया साधली. गोव्यातर्फे सलामीचा शिवेंद्र भुजबळने ४४, तर यश कसवणकरने ३६ धावा केल्या.

उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) पहिल्या डावात ३८ धावांची आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात चार धक्के बसल्यामुळे सोमवारी दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा यजमान संघाची ४ बाद १०२ अशी स्थिती होती. त्यांच्यापाशी आता एकूण १४० धावांची आघाडी जमा झाली आहे. कर्णधार आर्यन जुयाल ६० धावांवर खेळत आहे, तर पहिल्या डावातील शतकवीर रिंकू सिंग अजून फलंदाजीस यायचा आहे. उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या डावाची सुरवात सनसनाटी ठरली. पहिल्या डावात पाच गडी बाद केलेला ऑफस्पिनर यश कसवणकरने दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकातील चार चेंडूंत दोघांना बाद केल्यामुळे उत्तर प्रदेशची २ बाद १ धाव अशी नाजूक स्थिती झाली. कसवणकरने

अभिषेक गोस्वामी याला त्रिफळाचीत, तर माधव कौशिक याला पायचीत बाद केले. नंतर जुयाल व करण शर्मा (३१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. दिवसाच्या अखेरच्या सत्रातील काही षटके बाकी असताना अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याने करणला पायचीत बाद करून धोकादायक जोडी फोडली, तर कर्णधार ऑफस्पिनर अभिनव तेजराणा याने दिवसाच्या अखेरच्या षटकात नाईट वॉचमन झीशान अन्सारी याला पायचीत बाद केले.

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश, पहिला डाव ः २०२

गोवा, पहिला डाव ः ६१.३ षटकांत सर्वबाद १६४ (सुयश प्रभुदेसाई १९, शिवेंद्र भुजबळ ४४, अभिनव तेजराणा २६, स्नेहल कवठणकर ०, ललित यादव १, यश कसवणकर ३६, दर्शन मिसाळ ११, ऋत्विक नाईक ९, अमूल्य पांड्रेकर नाबाद ७, वासुकी कौशिक ६, शुभम तारी ४, कार्तिक यादव २-३४, वंश चौधरी २-२७, झीशान अन्सारी ५-४५, करण शर्मा १-१५).

उत्तर प्रदेश, दुसरा ः ३८ षटकांत ४ बाद १०२ (अभिषेक गोस्वामी ०, माधव कौशिक ०, आर्यन जुयाल नाबाद ६०, करण शर्मा ३१, झीशान अन्सारी ३, कार्तिक यादव नाबाद १, यश कसवणकर ११-२-२७-२, दर्शन मिसाळ १६-३-३९-१, ललित यादव ५-०-१५-०, अमूल्य पांड्रेकर ५-०-१४-०, अभिनव तेजराणा १-०-१-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Ketu Yuti: नोकरी आणि व्यवसायात घवघवीत यश मिळवण्याची सुवर्णसंधी, सिंह राशीतील गुरु-केतु युती ठरणार फायदेशीर; आयुष्यात घेऊन येणार सुख, समृद्धी

Children Internet Rights: मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवणे हास्यास्पद; सर्वोच्च न्यायालयाचा पालकांना आणि समाजाला विचार करायला लावणारा मोठा निकाल!

आदि शंकराचार्यांच्या आत्महत्येचा दावा चुकीचा; माहिष्मतीचा वाद जिंकून त्यांनी केली होती चार पीठांची स्थापना! ऐतिहासिक चुकीवर प्रकाश

Goa Assembly Election 2027: युगोडेपात घराणेशाहीला कोणतेही स्थान नाही! मिकी पाशेको बाणावलीतून लढणार निवडणूक

खरी कुजबुज: गिरे तो भी टांग उपर

SCROLL FOR NEXT