Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Vs Punjab: गोव्याचे पंजाबला दमदार प्रत्युत्तर! 92 धावांची अभेद्य सलामी; 'सुयश'चे अर्धशतक

Ranji Trophy 2025: चार दिवसीय सामना न्यू चंडीगड येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा सुयश ५८ धावांवर खेळत होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पंजाबला पहिल्या डावात सव्वातीनशे धावांत रोखल्यानंतर गोव्याने रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दमदार प्रत्युत्तर दिले. अर्धशतकवीर सुयश प्रभुदेसाई व मंथन खुटकर यांनी संघाला २४ षटकांतच ९२ धावांची शानदार अभेद्य सलामी दिली.

चार दिवसीय सामना न्यू चंडीगड येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा सुयश ५८ धावांवर खेळत होता. त्याने ६२ चेंडूंचा सामना करताना आठ चौकार लगावले.

कर्नाटकविरुद्ध मागील लढतीच्या दुसऱ्या डावात चमकदार अर्धशतक केलेला डावखुरा मंथन ३२ धावांवर खेळत आहे. त्याने ८४ चेंडूंतील खेळीत चार चौकार लगावले. गोव्याचा संघ पहिल्या डावात अजून २३३ धावांनी मागे आहे.

त्यापूर्वी, कालची नाबाद जोडी कर्णधार उदय सहारन व सलिल अरोरा यांनी सकाळी पंजाबला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. मात्र दोघेही पाच चेंडूंच्या अंतराने बाद झाल्यामुळे पंजाबची ७ बाद २५६ अशी स्थिती झाली. सहारनला डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळने पायचीत बाद केले.

२१ वर्षीय कर्णधाराने पहिल्या रणजी करंडक शतकी खेळीत १२६ धावा करताना ३०६ चेंडूंचा सामना केला व ११ चौकार मारले. वैयक्तिक ६३ धावांवर साहिल याला दीपराज गावकर याने यष्टिरक्षक समर दुभाषी याच्याकरवी झेलबाद केले. सहारन व अरोरा जोडीने सहाव्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी केली. नंतर प्रेरित दत्ता (२९) व मयंक मार्कंडे (२५) या नवव्या विकेटच्या जोडीने ४६ धावांची भागीदारी करून किल्ला लढविल्यामुळे पंजाबला ३२५ धावा करता आल्या.

संक्षिप्त धावफलक ः पंजाब, पहिला डाव (५ बाद २१५ वरुन) ः १३५.४ षटकांत सर्वबाद ३२५ (उदय सहारन १२६, सलिल अरोरा ६३, प्रेरित दत्ता २९, मयंक मार्कंडे २५, अर्जुन तेंडुलकर २७-५-८१-१, वासुकी कौशिक २९-१२-५१-२, दर्शन मिसाळ ३५.४-११-७२-३, दीपराज गावकर १८-५-३४-३, मोहित रेडकर ११-१-४१-१, ललित यादव १५-२-३२-०).

गोवा, पहिला डाव ः २४ षटकांत बिनबाद ९२ (सुयश प्रभुदेसाई नाबाद ५८, मंथन खुटकर नाबाद ३२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT