Shubham Tari Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: गोव्यानं मणिपूरची उडवली दाणादाण; समर दुभाषीची शानदार खेळी अन् शुभमचा भेदक मारा ठरला निर्णयाक!

Ranji Trophy Cricket Tournament: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पणातील डावात पाच गडी बाद केलेल्या वेगवान शुभम तारी याच्या भेदकतेच्या बळावर गोव्याने प्लेट विभाग लढतीत मणिपूरवर वर्चस्व राखले.

Manish Jadhav

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पणातील डावात पाच गडी बाद केलेल्या वेगवान शुभम तारी याच्या भेदकतेच्या बळावर गोव्याने प्लेट विभाग लढतीत मणिपूरवर वर्चस्व राखले. आता त्यांना रविवारी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी विजयाची संधी प्राप्त झाली आहे.

मणिपूरचा पहिला डाव 98 धावांत गुंडाळून गोव्याने पहिल्या डावात 278 धावांची आघाडी संपादली. शनिवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतर पावसाने हजेरी लावली तेव्हा फॉलोऑननंतर मणिपूरने (Manipur) दुसऱ्या डावात 1 बाद 55 धावा केल्या होत्या. पावासामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. पाहुणा संघ अजून 223 धावांनी पिछाडीवर आहे. 98 ही मणिपूरची गोव्याविरुद्ध रणजी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या ठरली.

त्यापूर्वी, कालच्या 7 बाद 302 धावांवरुन गोव्याने शनिवारी सकाळी पहिल्या डावात 376 धावा केल्या. संघात पुनरागमन करणारा यष्टिरक्षक-फलंदाज समर दुभाषी याच्या शानदार 75 धावांमुळे गोव्याला पावणेचारशे धावांचा टप्पा गाठता आला. समर पहिल्या दिवसअखेर 39 धावांवर नाबाद होता. त्याने एकंदरीत 139 चेंडूंचा सामना करताना सात चौकार मारले. त्याचे हे कारकिर्दीतील तिसरे प्रथम श्रेणी अर्धशतक ठरले. समरने आठव्या विकेटसाठी ऋत्विक नाईक (19) याच्यासमवेत 56 धावांची भागीदारी केली.

गोव्याचा चौथा गोलंदाज

गोव्यातर्फे (Goa) झटपट क्रिकेटमध्ये खेळलेल्या शुभमने पहिल्याच रणजी क्रिकेट डावात भन्नाट मारा केला. त्याने सलग 12.1 षटके प्रभावी मारा करताना 41 धावांत 5 गडी बाद केला. गोव्यातर्फे रणजी क्रिकेट पदार्पणात डावात 5 गडी बाद करणारा तो चौथा, मणिपूरविरुद्ध अशी कामगिरी साधणारा गोव्याचा तिसरा गोलंदाज ठरला. मणिपूरच्या पहिल्या डावात सर्वाधिक 25 धावा केलेल्या प्रफुल्लोमणी याला मंथन खुटकर याने कव्हर्स क्षेत्रात झेलबाद केले. 23 वर्षीय शुभमचा हा डावातील पाचवा बळी ठरला.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (7 बाद 302 धावांवरुन): 109.2 षटकांत सर्वबाद 376 (समर दुभाषी 75, ऋत्विक नाईक 19, हेरंब परब 12, शुभम तारी नाबाद 0, राजकुमार रेक्स सिंग 2-43, बिश्वोर्जित सिंग 2-65, प्रियोजित सिंग 2-39, अजय सिंग 2-87).

मणिपूर, पहिला डाव: 25.1 षटकांत सर्वबाद 98 (जॉन्सन 12, प्रफुल्लोमणी 25, ऋत्विक नाईक 9-2-39-2, शुभम तारी 12.1-1-41-5, दर्शन मिसाळ 2-1-1-1, मोहित रेडकर 2-0-2-2) व दुसरा डाव: 16 षटकांत 1 बाद 55 (करणजित नाबाद 41, दर्शन मिसाळ 1-18).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मेट्रोतील 'इन्स्टा' वेड! 'बॅटमॅन' बनून रिल करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'एवढी ताकद अभ्यासात लावली असती तर...'

Japan PM Resign: जपानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची राजीनाम्याची घोषणा, कारण काय?

Surla Eco Tourism: 'सुर्ला प्रकल्प ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा'; डॉ. देविया राणे

Goa Politics: भाजपला सनातन धर्माची पर्वा व आदर नाही, प्रदेशाध्यक्ष दामूंच्या वाढदिवशी मंदिरात केक कापणे 'अधर्म', काँग्रेसचा हल्लाबोल

Devarai: ..काही कोटी वर्षांपूर्वीचे, भारतात चारच ठिकाणी असणारे वृक्ष; गोव्यातील देवराया आणि त्यांचे महत्व

SCROLL FOR NEXT