Ranji Trophy 2025 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy 2025: गोव्याने पत्करला डावाने दारुण पराभव, रणजी क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा सामना गमावला; सौराष्ट्राची प्रगती

Goa Cricket: कणाहीन फलंदाजी आणि सौराष्ट्राच्या पार्थ भूत याची भेदक फिरकी यामुळे रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला अपेक्षेनुसार बुधवारी डावाने दारुण पराभव पत्करावा लागला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कणाहीन फलंदाजी आणि सौराष्ट्राच्या पार्थ भूत याची भेदक फिरकी यामुळे रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला अपेक्षेनुसार बुधवारी डावाने दारुण पराभव पत्करावा लागला. एलिट ब गटात स्नेहल कवठणकर याच्या नेतृत्वाखालील संघाने ओळीने दुसरा सामना गमावला.

राजकोट येथे झालेल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान सौराष्ट्राने डाव व ४७ धावांनी विजय मिळवून बोनससह एकूण सात गुणांची कमाई केली, तसेच गुणतक्त्यातही प्रगती साधली. विजयाचा शिल्पकार ठरलेला २८ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज पार्थ भूत याने दुसऱ्या डावात ५६ धावांत ७ गडी टिपले. पहिल्या डावातील २ विकेटसह त्याने सामन्यांत १२७ धावांत ९ गडी बाद केले. पार्थ याने कारकिर्दीत पाचव्यांदा डावात पाच गडी बाद करण्याची किमया साधली. तोच सामन्याचा मानकरी ठरला.

सौराष्ट्राने पहिल्या डावात २२७ धावांची आघाडी घेत गोव्यावर फॉलोऑन लादला होता. तिसऱ्या दिवसअखेरच्या २ बाद ७७ धावांवरून गोव्याचा डाव चौथ्या दिवशी दुपारी १८० धावांत संपुष्टात आला.

मंगळवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात गोव्याचा फॉर्ममधील हुकमी फलंदाज अभिनव तेजराणा (३४) याला पायचीत बाद करून पार्थ याने सौराष्ट्राच्या विजयाचा पाया घातला होता. गोव्याच्या बाकी फलंदाजांनी बुधवारी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम बजावले. त्यांना यजमान संघाच्या प्रभावी फिरकीला तोंड देता आले नाही.

सौराष्ट्राविरुद्ध तिसऱ्यांदा हार

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याला आता सौराष्ट्राविरुद्ध सहा लढतीत तिसरा पराभव पत्करावा लागला. इतर दोन लढती अनिर्णित राहिल्या असून गोव्याने एकमात्र विजय २३ वर्षांपूर्वी नोंदविला होता.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र, पहिला डाव ः ७ बाद ५८५ घोषित

गोवा, पहिला डाव ः ३५८

गोवा, दुसरा डाव (फॉलोऑननंतर, २ बाद ७७ वरुन) ः ५४.५ षटकांत सर्वबाद १८० (मंथन खुटकर ३६, स्नेहल कवठणकर २५, ललित यादव १९, दीपराज गावकर ९, दर्शन मिसाळ ०, राजशेखर हरिकांत १४, अर्जुन तेंडुलकर १३, मोहित रेडकर ४, वासुकी कौशिक नाबाद ५, धर्मेंद्रसिंग जडेजा १-३४, जयदेव उनाडकट २-२९, पार्थ भूत १७.५-२-५६-७).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tenant Verification Goa: उत्तर गोवा पोलिसांची मोठी मोहीम! प्रतिबंधात्मक पोलीसिंगला धार; 66 हजारांहून अधिक भाडेकरुंची पडताळणी

Goa Politics: "मुख्यमंत्र्यांची बैठक 'फोटोसेशन'साठी", वेन्झी व्हिएगस यांची राज्यपालांकडे 'पूर्णवेळ गृहमंत्र्या'ची मागणी

Goa Live News: SIR प्रक्रियेत गोवा राज्य देशात अव्वल; 10 दिवसांत 55% फॉर्म गोळा

Bengaluru Robbery: बंगळूरुमध्ये 7.11 कोटींची कॅश व्हॅन लुटली! 'आरबीआय अधिकारी' असल्याची बतावणी करत दिली पिस्तुलाची धमकी

Motivational Video: हिंमत असावी तर अशी! 80 वर्षांच्या आजोबांनी घेतली 15,000 फूट उंचीवरून झेप, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT