Snehal Kavthankar  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: स्नेहलचा शतकी दणका! मिझोरामविरुद्ध गोव्याच्या फलंदाजांचा दबदबा; पहिल्या डावात उभारला धावांचा डोंगर

Goa Vs Mizoram: मिझोरामच्या माऱ्यातील मर्यादा स्पष्ट करताना रणजी करंडक प्लेट विभाग क्रिकेट लढतीत बुधवारी गोव्याच्या फलंदाजांनी अपेक्षेनुसार दबदबा राखला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फक्त तिघा नियमित गोलंदाजांसह मैदानात उतरलेल्या मिझोरामच्या माऱ्यातील मर्यादा स्पष्ट करताना रणजी करंडक प्लेट विभाग क्रिकेट लढतीत बुधवारी गोव्याच्या फलंदाजांनी अपेक्षेनुसार दबदबा राखला. त्यांनी दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद ३२२ धावा करुन मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या ब मैदानावर चार दिवसीय सामन्यास सुरवात झाली. कारकिर्दीतील आठवे रणजी करंडक शतक झळकावलेला स्नेहल कवठणकर १३५ धावांवर नाबाद आहे. त्याने २०८ चेंडूंचा सामना करताना १४ वेळा चेंडू सीमापार पिटाळला. नागालँडविरुद्ध दुसऱ्या डावात ७५ धावांची खेळी केलेल्या स्नेहलने तोच फॉर्म पुढे नेला. मात्र सलामीच्या मंथन खुटकर याला मोसमातील दुसरे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. के. सी. करिअप्पा याने त्याला ९५ धावांवर त्रिफळाचीत बाद केले. त्याने १८७ चेंडूंतील खेळीत ११ चौकार व दोन षटकार मारले. दिवसअखेर दीपराज गावकर नाबाद ५० धावा करून स्नेहलला साथ देत होता. त्याने ९७ चेंडूंतील खेळीत पाच चौकार लगावले.

स्नेहल व दीपराज यांनी चौथ्या विकेटसाठी ११२ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. त्यापूर्वी स्नेहलने मंथन याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी करून गोव्याच्या वर्चस्वाचा पाया घातला. त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या गोव्याची २ बाद ५९ अशी स्थिती होती. पाहुणा क्रिकेटपटू रोहन कदम फक्त १३ धावा करून बॉबी झोथानसांगा याच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद झाला. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या कश्यप बखले याने तीन चौकार लगावत चांगली सुरवात केली, पण वैयक्तिक १३ धावांवर तो करिअप्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

गोव्याने नागालँडविरुद्ध खेळलेल्या संघात दोन बदल केले. के. व्ही. सिद्धार्थ याची जागा कश्यप बखले याने घेतली, तर वेगवान गोलंदाजीत शुभम तारीऐवजी हेरंब परब याला प्राधान्य मिळाले.

अनुभवी फलंदाजाची शतकी किमया

५४ व्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात२९ वर्षीय स्नेहल कवठणकरचे ८ वे शतक

गोव्यातर्फे सर्वाधिक शतकांत स्वप्नील अस्नोडकर (१४) व सगुण कामत (९) यांच्यानंतर तिसरा

२०२२-२३ मध्ये छत्तीसगडविरुद्ध रायपूर येथे स्नेहलचे यापूर्वीचे सातवे शतक (नाबाद १४७)

हरियानाविरुद्ध गाझियाबाद येथे २०१६-१७ मोसमात २२५ धावा वैयक्तिक सर्वोच्च

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT