Ranji Cricket Trophy 2024 Goa Vs Sikkim
पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील प्लेट गटातील पहिल्या लढतीत गोव्याच्या चुकांचा लाभ उठवत मणिपूरने दुसऱ्या डावात साडेतीनशे धावांची मजल मारली. आता शुक्रवारपासून (ता. १८) खेळल्या जाणाऱ्या लढतीत सिक्कीमला कमी लेखणे धोक्याचे ठरेल.
गोवा आणि सिक्कीम यांच्यातील चार दिवसीय सामना रंगपो येथे खेळला जाईल. दोन्ही संघांनी पहिल्या लढतीत विजय मिळवलेला असल्याने प्रत्येकी सहा गुण आहेत. गोव्याने पर्वरी येथे मणिपूरला नऊ विकेट राखून हरविले, पण त्यांना बोनस गुण हुकला. मिझोरामने रंगपो येथेच अगोदरच्या लढतीत मिझोरामला १३७ धावांनी नमविले.
गोव्याच्या तुलनेत सिक्कीमची फलंदाजी कमजोर असली, तर त्यांचे गोलंदाज धक्के देऊ शकतात. मणिपूरविरुद्ध सुयश प्रभुदेसाईचे शतक (१२०), तसेच कर्णधार दर्शन मिसाळ (५१) व समर दुभाषी (७५) यांच्या अर्धशतकांमुळे गोव्याने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना तुलनेत कमकुवत गोलंदाजीविरुद्ध मोठी धावसंख्या रचता आली नव्हती.
गोव्याचा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर दुखापतीमुळे मणिपूरविरुद्ध खेळू शकला नव्हता. तो सिक्कीमविरुद्ध खेळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ऋत्विक नाईकला संघाबाहेर जाणे भाग पडेल.
शुभम तारी याने मणिपूरविरुद्ध पदार्पणात नऊ गडी बाद करताना अनुक्रमे पाच व चार विकेट टिपल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात तो गोलंदाजीवर पूर्ण नियंत्रण राखू शकला नव्हता. मणिपूरविरुद्ध दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झालेला गोव्याचा हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई तंदुरुस्त असल्याची माहिती आहे.
सामना ः ९-१२ डिसेंबर २०१९, पर्वरी
निकाल ः गोवा ९ विकेट राखून विजयी
सर्वोच्च धावसंख्या ः गोवा ः ४३६-६ घोषित; सिक्कीम ः ३७४-१०
सर्वोच्च वैयक्तिक ः गोवा ः १३४ - स्नेहल कवठणकर; सिक्कीम ः १३५ - इक्बाल अब्दुल्ला
डावात उत्कृष्ट गोलंदाजी ः गोवा ः ३-२३ लक्षय गर्ग; सिक्कीम ः २-९६ ईश्वर चौधरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.