Goa vs Kerala Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: दर्शन - अर्जुन तेंडुलकरची झुंज अपयशी! गोव्याच्या फलंदाजांची शरणागती; केरळ 9 विकेट राखून विजयी

Goa vs Kerala : २०२५-२६ मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटातील मोहिमेचा समारोप सलग चौथ्या पराभवाने झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Ranji Trophy 2026 : सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी गोव्याच्या प्रमुख फलंदाजांनी दुसऱ्या डावात संयमाने खेळणे आवश्यक होते, १७१ धावांच्या पिछाडीचा दबाव होताच, पण केरळच्या प्रभावी गोलंदाजीसमोर यजमानांनी पूर्णपणे शरणागती पत्करली. त्यामुळे २०२५-२६ मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटातील मोहिमेचा समारोप सलग चौथ्या पराभवाने झाला.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर केरळने सामना नऊ विकेटने जिंकून मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली. विजयासाठी २९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केरळने एक गडी गमावला, परिणामी त्यांना बोनस गुणाला मुकावे लागले. सामन्यातून त्यांनी सहा गुण प्राप्त करत गुणतक्त्यातील स्थानही सुधारले.

त्यांचे सात सामन्यांतून १४ गुण झाले व त्यांना पाचवा क्रमांक मिळाला. सुरवातीच्या तीन सामन्यांत एक विजय व दोन अनिर्णित निकालांसह ११ गुणांची कमाई केलेल्या गोव्याला नंतर ओळीने चार पराभव पत्करावा लागल्याने सहावा क्रमांक मिळाला. केरळअगोदरच्या लढतीत त्यांना मध्य प्रदेश, सौराष्ट्र व महाराष्ट्राने हरविले होते.

दर्शन मिसाळ (५५, ८२ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) व अर्जुन तेंडुलकर (२४, ३६ चेंडू, ३ चौकार) यांनी नवव्या विकेटसाठी ६० धावांची झुंझार भागीदारी केल्यामुळे केरळला विजयासाठी दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरावे लागले. गोव्याने दुसऱ्या डावात १९९ धावा केल्या. केरळचा मध्यमगती गोलंदाज एम. डी. निधीश याने ४७ धावांत ५ गडी टिपले. अशी कामगिरी त्याने ५१व्या प्रथम श्रेणी सामन्यात नवव्यांदा केली.

सामन्यातील दोन्ही डावांत मिळून नऊ गडी (६-११५ व ३-५६) बाद करणारा केरळचा डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याविरुद्धच्या २७ सामन्यांत केरळचा हा १२ वा विजय ठरला, तर पाहुण्या संघाने गोव्यात सहाव्या विजयाची नोंद केली.

रणजी करंडक एलिट ब गटात प्रत्येकी सात सामने खेळल्यानंतर मध्य प्रदेशचे २८, कर्नाटकचे २७, सौराष्ट्रचे २६, महाराष्ट्राचे २४, केरळचे १४, गोवा व पंजाबचे प्रत्येकी ११, तर चंडीगडचे आठ गुण झाले. या गटातून मध्य प्रदेश व कर्नाटक संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ३५५

केरळ, पहिला डाव ः ९ बाद ५२६ घोषित

गोवा, दुसरा डाव (बिनबाद १८ वरून) ः ५३.३ षटकांत सर्वबाद १९९ (सुयश प्रभुदेसाई १४, कश्यप बखले १५, अभिनव तेजराणा १७, स्नेहल कवठणकर ०, ललित यादव २७, अमूल्य पांड्रेकर ३२, यश कसवणकर ६, दर्शन मिसाळ ५५, समर दुभाषी ६, अर्जुन तेंडुलकर २४, वासुकी कौशिक नाबाद ०, अंकित शर्मा १८-२-५६-३, एम. डी. निधीश १३.३-२-४७-५).

केरळ, दुसरा डाव ः ५.५ षटकांत १ बाद २९ (अभिषेक नायर नाबाद १९, सचिन बेबी १, सलमान निझार नाबाद ९, वासुकी कौशिक ३-१-३-१, अमूल्य पांड्रेकर २.५-०-२६-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT