Purvi Naik  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Swimming Championship: पूर्वीची पुन्हा ‘रुपेरी’ कामगिरी; राष्ट्रीय स्पर्धेत तिसरे पदक

Purvi Naik: पूर्वी नाईक हिने शानदार कामगिरीची मालिका कायम राखताना सलग दुसरे रौप्य, तर एकंदरीत तिसरे पदक जिंकले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याची प्रतिभाशाली युवा जलतरणपटू पूर्वी नाईक हिने राष्ट्रीय सबज्युनियर-ज्युनियर जलतरण स्पर्धेतील शानदार कामगिरीची मालिका कायम राखताना गुरुवारी सलग दुसरे रौप्य, तर एकंदरीत तिसरे पदक जिंकले. स्पर्धा ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू आहे.

पूर्वी हिने गुरुवारी मुलींच्या गट तीनमधील ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत ५ मिनिटे ०४.२२ सेकंद वेळेसह रौप्यपदकाची कमाई केली. हरियानाची सेरेना सरोहा (५ मिनिटे ५७.७० सेकंद) हिने सुवर्णपदक, तर कर्नाटकच्या स्तुती सिंग (५ मिनिटे ०४.२९ सेकंद) हिने ब्राँझपदक मिळविले.

पूर्वी हिने स्पर्धेत बुधवारी १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये (१ मिनिट ०७.२३ सेकंद) रौप्यपदक, तर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी २०० मीटर फ्रीस्टाईल (२ मिनिटे ३०.६२ सेकंद) शर्यतीत ब्राँझपदक प्राप्त केले होते.

पूर्वी नाईक कांपाल-पणजी येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील जलतरण प्रशिक्षणार्थी आहे. तिला प्रशिक्षक टी. ए. सुजित यांचे मार्गदर्शन लाभते. मूळ हरवळे-साखळी येथील ही जलतरणपटू कुजिरा येथील मुष्टिफंड हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

SCROLL FOR NEXT