National Games 2025 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

38th National Games 2025: अभिमानास्पद... गोव्याच्या बाबूची रौप्याला गवसणी, 'लेझर रन'मध्ये एकूण चार पदके

38th National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्यासाठी मॉडर्न पेंटॅथलॉन खेळ पुन्हा एकदा पदक विजेता ठरला.

Sameer Amunekar

पणजी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्यासाठी मॉडर्न पेंटॅथलॉन खेळ पुन्हा एकदा पदक विजेता ठरला. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी या खेळातील लेझर रन प्रकारात तीन रौप्य आणि एक ब्राँझ मिळून एकूण चार पदके जिंकली. त्यात बाबू गावकर याचे वैयक्तिक पुरुष प्रकारातील रौप्यपदक उल्लेखनीय ठरले.

पुरुषांच्या लेझर रन वैयक्तिक प्रकारात बाबू गावकर याला रौप्यपदक, तसेच पुरुष लेझर रन सांघिक आणि मिश्र रिलेतही रौप्यपदक प्राप्त झाले. महिलांना लेझर रन सांघिक प्रकारात ब्राँझपदक मिळाले. सांघिक प्रकारात बाबूसह सूरज वेळीप, हरिश्चंद्र वेळीप, नेहा गावकर, अंकिता वेळीप, वैष्णवी वड्डार यांनी प्रतिनिधित्व केले.

बाबू गावकर याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत लागोपाठ दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली. अवघ्या पाच सेकंदाच्या फरकाने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला शनिवारी मॉडर्न पेंटॅथलॉनमधील लेझर रन प्रकारात तीन रौप्य व एक ब्राँझ मिळून एकूण चार पदके प्राप्त झाली.

गोलापार-हल्दवानी येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात शनिवारी मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेला सुरवात झाली. पहिल्या दिवशी लेझर रन क्रीडा प्रकारात स्पर्धा झाली. या प्रकारातील वैयक्तिक पुरुष प्रकारात २४ वर्षीय बाबू याने ११.०१.०२ मिनिटे वेळ नोंदविली, तर सुवर्णपदक विजेत्या उत्तराखंडच्या सक्षम प्रताप सिंग याने १०.५४.०८ मिनिटांत पहिला क्रमांक मिळविला.

उत्तराखंडच्याच लाल सिंग (११.२४.६४ मिनिटे) याला ब्राँझपदक मिळाले.बाबू याने सांघिक प्रकारात आणखी दोन रौप्यपदके जिंकली.

त्याने लेझर रन सांघिक पुरुष गटात सूरज वेळीप व हरिश्चंद्र वेळीप यांच्यासमवेत दुसरा क्रमांक मिळविला, तर नेहा गावकर हिच्यासमवेत लेझर रन मिश्र रिलेत १४.४८.६३ मिनिटे वेळ नोंदवत रौप्यपदकाची कमाई केली. नेहा गावकर, अंकिता वेळीप व वैष्णवी वड्डार यांचा समावेश असलेल्या गोव्याच्या महिला संघाला लेझर रन सांघिक प्रकारात ब्राँझपदक मिळाले.

२०२३ साली घरच्या मैदानावर झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये एकूण आठ पदके मिळाली होती. यामध्ये प्रत्येकी एक सुवर्ण व रौप्य, तसेच सहा ब्राँझपदकांचा समावेश होता.

गतवेळी घरच्या मैदानावर सुवर्ण

नेत्रावळी येथील बाबू गावकर याने २०२३ साली गोव्याच्या झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक लेझर रन प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. यावेळेस अगदी थोडक्यात त्याला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली, मात्र त्याने स्पर्धेतील पदकांचा लौकिक कायम राखला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

WPL 2027 चं बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात स्मृतीची 'आरसीबी' भिडणार हरमनप्रीतच्या 'मुंबई इंडियन्स'शी; पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक!

SCROLL FOR NEXT