Sameer Amunekar
कोकण आणि गोवा ही दोन्ही ठिकाणं पश्चिम किनारपट्टीवरील निसर्गसंपन्न पर्यटनस्थळं आहेत. दोन्ही ठिकाणी सुंदर समुद्रकिनारे, घनदाट जंगले, धबधबे आणि जैवविविधता आहे.
नाईटलाइफ आणि थरारक कॅसिनोचा अनुभव घ्यायचा विचार करत असाल, तर ही ठिकाणं तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. समुद्रकिनारे, पार्टीचा आनंद घेण्यासाठी गोवा बेस्ट पर्याय आहे.
शांत, निसर्गरम्य जंगलं, डोंगरांचा अनुभव हवा असल्यास कोकण सर्वोत्तम पर्याय आहे. हिरव्यागार वनराईत फेरफटका कोकण तुमच्यासाठी योग्य आहे.
कोकण आणि गोवा दोन्ही ठिकाणी निसर्गसौंदर्याची अनोखी जादू आहे. दोन्ही ठिकाणचा निसर्ग सुंदर आहे.
कोकण सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत पसरलेलं आहे. जिथे तुम्हाला शांत, प्रदूषणमुक्त वातावरण, धबधबे आणि पारंपरिक कोकणी जीवनशैलीचा अनुभव मिळतो.
गोवा सुंदर समुद्रकिनाऱ्यांसह ऐतिहासिक चर्च, किल्ले, अभयारण्यं आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे.