Margao under 13 chess championship Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Chess: 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वाढली चुरस! शौनक, दीक्षिता विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर

Goa Chess Competition: राष्ट्रीय ३८व्या १३ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाच्या शर्यतीत खुल्या गटात महाराष्ट्राचा शौनक बडोले, तर तेलंगणाची दीक्षिता मोडीपल्ली मुलींच्या गटात आघाडीवर आहे.

Sameer Panditrao

पणजी: राष्ट्रीय ३८व्या १३ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाच्या शर्यतीत खुल्या गटात महाराष्ट्राचा शौनक बडोले, तर तेलंगणाची दीक्षिता मोडीपल्ली मुलींच्या गटात आघाडीवर आहे. स्पर्धेच्या अंतिमपूर्व दहाव्या फेरीअंती त्यांनी प्रत्येकी नऊ गुणांची नोंद केली.

स्पर्धा मडगाव येथील दैवज्ञ भवनात सुरू आहे. स्पर्धेची शेवटची अकरावी फेरी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळली जाईल. सोमवारी स्पर्धेच्या दहाव्या फेरीत पहिल्या बोर्डवर शौनक (एलो २०८६) याने हरियानाचा कँडिडेट मास्टर व्योम मल्होत्रा याला पराभूत करून आघाडी टिकवली.

अव्वल मानांकित कर्नाटकचा सिद्धांत पूंजा (एलो २२१५) याने महाराष्ट्राच्या सिद्धांत साळुंके याला नमविले. पूंजा याचे आठ गुण झाले असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींच्या गटात वूमन कँडिडेट मास्टर दीक्षिता हिने आघाडी टिकविताना पहिल्या बोर्डवर स्पर्धेतील अव्वल मानांकित आंध्र प्रदेशची आमुक्ता गुंटाका हिच्याविरुद्धचा डाव बरोबरीत राखला.

आमुक्ता हिचे साडेसात गुण झाले आहेत. दुसऱ्या बोर्डवर पश्चिम बंगालच्या मैत्रेयी मोंडल हिने आंध्र प्रदेशच्या श्राव्याश्री भीमारासेट्टी हिला पराभूत केले. मैत्रेयी आता साडेआठ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या बोर्डवर महाराष्ट्राच्या मिशा परवेझ हिने कर्नाटकाची प्रतिती बोर्डोलोई हिला पराभूत केले. मिशा हिचे आठ गुण झाले असून ती तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गोमंतकीय खेळाडूंची चमक

स्पर्धेतील गोमंतकीय बुद्धिबळपटूंत खुल्या गटात जोशुआ तेलिस (७ गुण) याने महाराष्ट्राच्या कुशाग्र पालिवाल याला नमविले. सरस पोवार (साडेपाच गुण) याला मात्र महाराष्ट्राच्या शाश्वत गुप्ता याच्याकडून हार पत्करावी लागली. मॅक्सवेल रापोस याने महाराष्ट्राच्या मानस हाथी याला नमवून गुणसंख्या साडेपाचवर नेली. मुलींत गोव्याच्या अस्मी तेरसे (साडेसहा गुण) हिने आंध्र प्रदेशच्या व्ही. त्रिपुरांबिका हिला बरोबरीत रोखले. दिया सावळ (साडेपाच गुण) हिला केरळच्या ह्रदया राकेश हिच्याकडून मात स्वीकारावी लागली. स्कायला रॉड्रिग्ज (६ गुण) हिने गुजरातच्या राजवी शुक्ला हिला पराभूत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kasule: तळ्याच्या रक्षणासाठी केली श्रीगणरायाची स्थापना, पेडण्याच्या राजाचा Video Viral

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाची प्रक्रिया ‘जीएसआयडीसी’कडून सुरू! 60 कोटींचा प्रकल्‍प होणार 2 वर्षांत

FDA Raid: कळंगुट-बागा येथे 'सर्जिकल स्ट्राईक! निकृष्ट काजू विकणाऱ्यांवर चाप; एका रात्रीत 8 दुकाने, 3 रेस्टॉरंट बंद

Goa Rain: पाऊस थांबला, उकाडा वाढला! दमट हवामानाने नागरिक त्रस्त; तुरळक सरी कोसळण्याची शक्यता

Goa News: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त गोव्यात ‘सेवा पंधरवडा’! लोकसहभागातून राबवले जाणार उपक्रम

SCROLL FOR NEXT