Donovan Ferreira Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Viral Video|6 6 6 2 2 6: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा गर्दा, दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूची बॅट तळपली

MLC 2025 highlights: 2 जुलै रोजी एक रोमांचक सामना झाला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका तरुण खेळाडूने षटकारांचा पाऊस पाडून कहर केला.

Manish Jadhav

Donovan Ferreira: अमेरिकेत सध्या क्रिकेटचा रोमांच पाहायला मिळत आहे. येथे खेळल्या जात असलेल्या मेजर क्रिकेट लीग (एमएलसी 2025) च्या दुसऱ्या हंगामात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत आहे. 2 जुलै रोजी एक रोमांचक सामना झाला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एका तरुण खेळाडूने षटकारांचा पाऊस पाडला. हा खेळाडू आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, परंतु त्याला फक्त 1 सामना खेळण्याची संधी मिळाली. आता हाच खेळाडू पिवळ्या जर्सीमध्ये फक्त षटकारांचीच भाषा बोलत आहे.

दरम्यान, 3 जुलै रोजी दुसऱ्या हंगामातील 23वा सामना टेक्सास सुपर किंग्ज आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात खेळला गेला. पावसामुळे प्रभावित झालेला हा सामना 5 षटकांचा होता, ज्यामध्ये टेक्सास संघाने 5 षटकांत 2 गडी गमावून 87 धावा केल्या. डेनोवन फरेराने संघासाठी शेवटच्या षटकात 28 धावा काढल्या, ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकात काढलेल्या 28 धावांच्या आधारे टेक्सास संघाने 87 धावा केल्या, त्यानंतर गोलंदाजी करताना वॉशिंग्टनला 44 धावांतच रोखले आणि 43 धावांनी विजय संपादन केला.

मिचेल ओवेनला लय धुतलं

विजयाचा नायक डोनोवन फरेरा ठरला, त्याने 9 चेंडूत 5 षटकारांसह 37 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 411.11 होता. फरेराने आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जकडून पदार्पण करणाऱ्या मिचेल ओवेनला लक्ष्य केले. तो वॉशिंग्टनकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी आला. फरेराने या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर षटकारांची हॅटट्रिक केली, त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर अनुक्रमे 2 धावा आणि शेवटच्या चेंडूवर एक षटकार मारला. अशाप्रकारे ओवेनला 28 धावा काढल्या.

फरेराने चमत्कार केला

दरम्यान, टेक्सास संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मार्कस स्टॉयनिस आणि डॅरिल मिशेल संघाकडून सलामीला आले. स्टॉयनिस केवळ 2 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मिशेल 6 धावा काढून रिटायर्ड आउट झाला. तिसऱ्या नंबरवर खेळण्यासाठी आलेल्या शुभम रंजनेने 14 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. शेवटी, फरेराने 37 धावांची विस्फोटक खेळी खेळत चाहत्यांची मने जिंकली. 88 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फ्रीडमने 18 धावांच्या आत रचिन रवींद्र, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मिशेल ओवेन या 3 मोठ्या विकेट्स गमावल्या. हे त्यांच्या पराभवाचे कारण बनले. संपूर्ण संघ अवघ्या 44 धावा करु शकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New GST Rate: जीएसटी कॉन्सिलचा मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के दोनच कर; काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर

Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT