Milap Mewada coach Goa Ranji Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Goa Cricket Coach: दिल्लीचे के. भास्कर पिल्लई २०२१-२२ मोसमात गोव्याचे प्रशिक्षक बनले, पण अवघ्या तीन रणजी सामन्यांपुरती त्यांची कारकीर्द मर्यादित राहिली.

Sameer Panditrao

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) २०२५-२६ मधील देशांतर्गत क्रिकेट मोसमातील रणजी करंडक, विजय हजारे करंडक एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत खेळणाऱ्या सीनियर संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाची नुकतीच नियुक्ती केली. बडोद्याचे मिलाप मेवाडा एकंदरीत सहाव्या मोसमात सहावे प्रशिक्षक ठरले आहेत.

कोविडमुळे २०२०-२१ मोसमात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा झाली नाही. त्यापूर्वी २०१९-२० मोसमात प्लेट गटातील अव्वल क्रमांकासह रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या दोड्डा गणेश यांची २०२०-२१ मोसमासाठी प्रशिक्षकपदी फेरनिवड झाली, मात्र टी-२० स्पर्धा संपल्यानंतर त्यांनी आरोग्यसमस्येचे कारण देत पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्या प्रभारी मार्गदर्शनाखाली गोव्याचा संघ एकदिवसीय स्पर्धेत खेळला.

दिल्लीचे के. भास्कर पिल्लई २०२१-२२ मोसमात गोव्याचे प्रशिक्षक बनले, पण अवघ्या तीन रणजी सामन्यांपुरती त्यांची कारकीर्द मर्यादित राहिली. ते दशकभरातील गोव्याचे सर्वांत कमी रणजी सामन्यांत मार्गदर्शन केलेले प्रशिक्षक ठरले. २०२२-२३ मोसमात कर्नाटकच्या मन्सूर अली खान यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याची एलिट गटातील कामगिरी समाधानकारक ठरली, तरीही २०२३-२४ मोसमात अनपेक्षितपणे मुंबईचे विनोद राघवन रणजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाले.

राघवन यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याची कामगिरी अतिशय खराब ठरली. सातपैकी पाच सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे गोव्याची एलिटमधून प्लेट गटात पदावनती झाली. माजी आंतरराष्ट्रीय अष्टपैलू दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने प्लेट गट अंतिम लढतीसह सहाही सामने जिंकून शंभर टक्के विजयी कामगिरी नोंदीत करुन पुन्हा एलिट गटात स्थान मिळविले.

मोंगिया यांना मुदतवाढीची शक्यता असताना त्यांनी करार लांबविण्यास अनुत्सुकता दर्शविली, त्यामुळे २०२५-२६ मोसमासाठी नवा रणजी संघ प्रशिक्षक नियुक्त झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT