FC Goa Vs Mohun Bagan Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: एफसी गोवाच किंग! अग्रस्थानी असलेल्या मोहन बागानला पराभवाचा धक्का; ब्रायसनचे निर्णायक दोन गोल

FC Goa Vs Mohun Bagan: एफसी गोवाचा हा एकंदरीत सहावा विजय ठरला. त्यांचे आता १२ लढतीतून २२ गुण झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

FC Goa Won Against Mohun Bagan In ISL 2024 25

पणजी: मध्यरक्षक ब्रायसन फर्नांडिस याच्या दोन शानदार गोलच्या बळावर एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थानी असलेल्या कोलकत्याच्या मोहन बागान सुपर जायंट्सचा विजयरथ रोखला. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने २-१ फरकाने चमकदार विजय नोंदवून गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानापर्यंत प्रगती साधली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या लढतीत मोहन बागानला ओळीने चार विजयानंतर आणि सलग आठ सामने अपराजित राहिल्यानंतर पहिला पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी एफसी गोवाने आपली अपराजित मालिका सात सामन्यांपर्यंत लांबविली आहे. त्याने आता सलग सामन्यांत पाच विजय व दोन बरोबरींची नोंद केली आहे.

एफसी गोवाचा हा एकंदरीत सहावा विजय ठरला. त्यांचे आता १२ लढतीतून २२ गुण झाले आहेत. स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे गतवेळच्या शिल्ड विजेत्या होजे मोलिना यांच्या मार्गदर्शनाखालील मोहन बागानचे १२ लढतीनंतर २६ गुण आणि पहिला क्रमांक कायम राहिला. दुसऱ्या क्रमांकावरील मुंबई सिटीचे २४ गुण आहेत. एफसी गोवाचा पुढील सामना चार जानेवारी रोजी ओडिशा एफसीविरुद्ध होईल. मोहन बागान २६ जानेवारी रोजी पंजाब एफसीविरुद्ध खेळेल.

दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल

२३ वर्षीय ब्रायसन आणि स्पॅनिश बोर्हा हेर्रेरा या जोडगोळीच्या सुरेख समन्वयामुळे मोहन बागानचा बचाव कोलमडला. पहिला गोल १२व्या मिनिटास झाला. हेर्रेराच्या शानदार असिस्टवर ब्रायसनने मारलेला फटका प्रतिस्पर्धी बचावपटू कर्णधार टॉम अल्ड्रेड याला चाटून गोलरक्षक विशाल कैथ याच्या डोक्यावरून अलगद गोलनेटमध्ये गेला. नंतर ५५व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर ऑस्ट्रेलियन दिमित्री पेट्राटोस याने मोहन बागानला बरोबरी साधून दिली. एफसी गोवाच्या आर्मांदो सादिकू याच्या हँडबॉलमुळे दिलेल्या पेनल्टी फटका निर्णयावर एफसी गोवा संघ नाखूष दिसला. नंतर ६८व्या मिनिटास ब्रायसनच्या कल्पकतेमुळे एफसी गोवाने पुन्हा आघाडी प्राप्त केली. सादिकू आणि यासीर यांच्या संयुक्त चालीवर हेर्रेरा याने तोलूनमापून दिलेल्या क्रॉसपासवरील चेंडूवर सहा यार्ड बॉक्समधून ब्रायसनने अचूक हेडिंग साधले. यावेळी गोलरक्षक विशाल काहीच करू शकला नाही

संघातील बदल परिणामकारक

एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मोहन बागानविरुद्धच्या लढतीसाठी संघात चार बदल केले व ते परिणामकारक ठरले. अकरा सदस्यीय संघात स्थान दिलेल्या महंमद यासीर, बोर्हा हेर्रेरा, ब्रायसन फर्नांडिस व आर्मांदो सादिकू यांनी उपयुक्तता सिद्ध केली.

दृष्टिक्षेपात सामना

ब्रायसन फर्नांडिसचे यंदा १२ सामन्यांत आता ३ गोल

एफसी गोवा सलग ७ सामने अपराजित (५ विजय, २ बरोबरी)

८ अपराजित लढतीनंतर मोहन बागानचा पहिला पराभव

मोहन बागानविरुद्ध आता एफसी गोवाचे ३ विजय

फातोर्डा येथे यापूर्वी २० नोव्हेंबर २०२२ रोजी एफसी गोवाचा मोहन बागानवर ३-० असा विजय

एफसी गोवाचे फातोर्डा येथे यंदा ६ सामने, त्यात ३ विजय, २ पराभव, १ बरोबरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT