Khelo India Tribal Games Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Khelo India Tribal Games: गोव्याच्या मानसीला गोळाफेकीत सुवर्ण, 'खेलो इंडिया आदिवासी' स्पर्धेत वैभव गावकरला उंच उडीत 'रौप्यपदक'

Khelo India Tribal Games Update: चिंबल येथील मानसी कुंकळकर हिने पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेत मंगळवारी गोव्यासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: चिंबल येथील मानसी कुंकळकर हिने पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेत मंगळवारी गोव्यासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. तिने महिलांच्या गोळाफेकीत प्रथम क्रमांक प्राप्त करताना ९.७२ मीटर्सची नोंद केली.

खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा ॲथलेटिक्स छत्तीसगडमधील जगदाळपूर येेथे सुरू आहे. गोव्याला मंगळवारी स्पर्धेत आणखी एक पदक मिळाले. पुरुषांच्या उंचउडीत धारबांदोड्यातील करमणे येथील वैभव गावकर याने रौप्यपदकाची कमाई केली. त्याने १.९१ मीटर अंतर पार केले; पण सुवर्णपदकासाठी १.९४ मीटर अंतर अवघड ठरले. ॲथलेटिक्समध्ये आता गोव्याला प्रत्येकी एक सुवर्ण व रौप्य मिळून एकूण दोन पदके मिळाली आहेत.

बांबोळी आरसीसी येथे ॲथलेटिक्स प्रशिक्षक देवी गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय मानसी हिने खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेच्या पात्रता फेरीत झारखंडमधील रांची येथेही पहिला क्रमांक मिळविला होता. गोळाफेकीतील सातत्य कायम राखताना तिने राष्ट्रीय पातळीवरील पहिले सुवर्णपदक प्राप्त केले. तिने जवळच्या प्रतिस्पर्ध्यांना खूपच मागे टाकले. बिहारच्या अनामिका गोंड हिला ९.५० मीटरसह रौप्य, तर मेघालयाच्या मेलिबाडक्रो हिला ९.४३ मीटरसह ब्राँझपदक मिळाले. मानसी ही पिलार येथील फादर आग्नेल महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

पुरुषांच्या उंचउडीत रौप्यपदक जिंकलेला २८ वर्षीय वैभव यालाही देवी गावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याचे हे प्रमुख राष्ट्रीय स्पर्धेतील पहिले पदक आहे. रांची येथे झालेल्या स्पर्धेच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या टप्प्यात वैभव याने अव्वल क्रमांक पटकावला होता. मुख्य स्पर्धेत त्याला सुवर्णपदकाने थोडक्यात हुकलावणी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री रमेश तवडकर, क्रीडा संचालक अजय गावडे यांनी स्पर्धेच्या तयारीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या व त्याचा खूप फायदा झाला, असे सांगून मानसी हिने संबंधितांचे आभार मानले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री रमेश तवडकर, क्रीडा संचालक अजय गावडे यांनी स्पर्धेच्या तयारीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या व त्याचा खूप फायदा झाला, असे सांगून मानसी हिने संबंधितांचे आभार मानले.

‘या स्पर्धेसाठी आम्हाला राज्य सरकारकडून खूपच चांगल्या सोयी मिळाल्या. गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून तयारीसाठी मिळालेले सहकार्य निर्णायक ठरले. याबद्दल मुख्यमंत्री, क्रीडामंत्री, क्रीडा संचालक, प्रशिक्षक तसेच इतर संबंधितांचे मी मनःपूर्वक आभार मानते. माझ्या यशात पालकांच्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे. त्यांनी मला खूप प्रेरित केले, त्यामुळे मी हे पदक जिंकू शकले. त्यांनाही सुवर्णपदकाचे श्रेय जाते.’

- मानसी कुंकळकर,

सुवर्णपदक विजेती गोळाफेकपटू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT