Ethan Vaz Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Chess Tournament: एथन, अमेयची अपराजित कूच; टॉप बोर्डवरील विजयासह तोलोगन अग्रस्थानी

Manohar Parrikar Chess Tournament: गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हामल (एलो २४९९) याला सलग चौथ्या डावात बरोबरीवर समाधान मानावे लागले.

Sameer Panditrao

पणजी: ‘मनोहर पर्रीकर’ गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ‘अ’ गटात गोव्याचे इंटरनॅशनल मास्टर (आयएम) एथन वाझ व अमेय अवदी यांनी आश्वासक खेळ आठव्या फेरीतही कायम राखला. एथन सलग आठ, तर अमेय सहा सामने अपराजित असून त्यांनी प्रत्येकी सहा गुण नोंदविले आहेत.

गोवा बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सहयोगाने घेतलेली स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. स्पर्धेत शुक्रवारी टॉप बोर्डवर काळ्या सोंगट्यासह खेळताना किर्गिझस्तानच्या सेमेतेई तोलोगन (एलो २३४०) याने बेलारुसचा ग्रँडमास्टर अॅलेक्झी फेडोरोव (एलो २४०९) याला पराभूत केले. ३५ वर्षीय किर्गिझ आयएम बुद्धिबळपटूचा हा स्पर्धेती सहावा विजय ठरला. स्पर्धेत अपराजित असलेल्या खेळाडूने आता सात गुणांसह निर्विवाद अग्रस्थान प्राप्त केले आहे.

रशियन आयएम अलेक्झांडर स्लिझेव्हस्की, भारतीय ग्रँडमास्टर एस. पी. सेतूरमण व आयएम आयुष शर्मा यांचे प्रत्येकी साडेसहा गुण झाले असून ते संयुक्त दुसरे आहेत. स्पर्धेतील आणखी दोन फेऱ्या बाकी आहेत.

गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हामल (एलो २४९९) याला सलग चौथ्या डावात बरोबरीवर समाधान मानावे लागले. आठव्या फेरीत त्याला मध्य प्रदेशचा कँडिडेट मास्टर माधवेंद्र शर्मा याने रोखले. अनुरागचे पाच गुण झाले असून तो ३५व्या स्थानी आहे. गोव्याचा आयएम ऋत्विज परब (एलो २३७१) याला आठव्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्याला तमिळनाडूचा फिडे मास्टर एल. एन. राम अरविंद (एलो २२४९) याने चकीत केले. त्यामुळे ऋत्विजचे साडेचार गुण कायम राहिले.

सुरवातीच्या पंधराजणांत स्थान

तेरा वर्षीय एथन ( याने शुक्रवारी स्पर्धेतील चौथ्या विजयाची नोंद करताना तमिळनाडूचा आयएम एस. नितीन (एलो २३३८) याला नमविले. अन्य चार डाव बरोबरीत राखलेला एथन स्पर्धेतील अपराजित खेळाडू आहे. अमेय (एलो २४२२) याने वैयक्तिक पाचव्या विजयाला गवसणी घातलाना तेलंगणाचा फिडे मास्टर अर्जुन अदिरेड्डी (एलो २३२७) याला पराजित केले. स्पर्धेच्या दुसऱ्या डावात हार पत्करल्यानंतर अमेयने अपराजित कूच राखली आहे. सध्या एथन अकराव्या, तर अमेय तेराव्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT