Mahesh Desai Team India Manager Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

Mahesh Desai Team India Manager: गोवा क्रिकेट असोसिएशनचे (GCA) अध्यक्ष आणि माजी रणजीपटू महेश देसाई यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी जबाबदारी सोपवली.

Manish Jadhav

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनचे (GCA) अध्यक्ष आणि माजी रणजीपटू महेश देसाई यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी जबाबदारी सोपवली. आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकेसाठी भारतीय संघाचे 'टीम मॅनेजर' म्हणून देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे गोव्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण असून राष्ट्रीय स्तरावर गोव्याचा मान उंचावला आहे.

बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत (India) दौऱ्यावर असून या मालिकेतील सामन्यांच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात महेश देसाई यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. बीसीसीआयने त्यांच्या अनुभवावर विश्वास दाखवत ही नियुक्ती केली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून भारतीय संघाच्या खेळाडूंचे नियोजन, सराव सत्रे आणि तांत्रिक गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी आता देसाई यांच्या खांद्यावर असेल.

महेश देसाई: एक यशस्वी क्रिकेट प्रवास

महेश देसाई यांनी गेल्या वर्षीच गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते गोव्याचे माजी रणजी खेळाडू असून 1985-86 च्या काळात त्यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे 2017 मध्ये नवी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या भारत-न्यूझीलंड टी-20 सामन्यातही त्यांनी 'मॅच ऑब्झर्व्हर' म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता भारतीय संघाला होणार आहे.

गोव्याच्या क्रिकेटला मिळणार चालना

महेश देसाई यांच्या या नियुक्तीमुळे गोव्यातील तरुण खेळाडूंना आणि क्रिकेट प्रेमींना प्रेरणा मिळणार आहे. यापूर्वी त्यांचे मोठे भाऊ चेतन देसाई यांनी देखील भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले होते. आता महेश देसाई यांना मिळालेली ही संधी गोव्यातील (Goa) क्रिकेट प्रशासनासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हीच सर्वात मोठी रिस्क!" विद्यार्थिनीच्या उत्तरानं राहुल गांधी अवाक; संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Crime News: "दोन मृतदेह अन् रक्तानं माखलेलं घर!" नराधम नवऱ्यानं बायको, सासूसह सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; संशयानं सुखी कुटुंबाची राखरांगोळी

Navpancham Drishti Yog 2026: "धाडसी निर्णय घ्या अन् मालामाल व्हा!" गुरु-वरुणचा नवपंचम दृष्टी योग, 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; घरात नांदणार सुख-समृद्धी

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

Horoscope 2026: घर घेण्याचं स्वप्न साकार होणार, जमीन व्यवहारातून मिळणार अफाट पैसा; 'या' राशीवर शनिदेवाची विशेष कृपा

SCROLL FOR NEXT