Crime News: "दोन मृतदेह अन् रक्तानं माखलेलं घर!" नराधम नवऱ्यानं बायको, सासूसह सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; संशयानं सुखी कुटुंबाची राखरांगोळी

Uttar Pradesh Double Murder News: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्याच सासरच्या घरात रक्ताचा थरार घडवला.
Uttar Pradesh Double Murder News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Double Murder News: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्याच सासरच्या घरात रक्ताचा थरार घडवला. संशयाचे भूत डोक्यात संचारलेल्या या नराधमाने पत्नी आणि सासूची गळा चिरुन हत्या केली, तर सासरे आणि स्वतःच्या तीन वर्षांच्या पोटच्या मुलावरही प्राणघातक हल्ला केला. या भीषण दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नगरा पोलीस ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली असून आरोपी सध्या फरार आहे.

मिळालेली माहिती अशी की, नगरा पोलीस ठाणे हद्दीतील बछईपुर येथील अंतू गुप्ता (55 वर्ष) यांनी आपली मुलगी प्रीती (22 वर्ष) हिचा विवाह काही वर्षांपूर्वी गड़वार परिसरातील अमित गुप्ता याच्याशी केला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली. अमित आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असे, ज्यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. या सततच्या जाचाला कंटाळून प्रीती गेल्या काही महिन्यांपासून आपल्या तीन वर्षांच्या मुलासह माहेरी बछईपुर येथे राहत होती. पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग अमितच्या मनात होता आणि त्यातूनच त्याने या हत्याकांडाचा कट रचला.

Uttar Pradesh Double Murder News
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

शनिवारी मध्यरात्री अमित छुप्या मार्गाने सासरच्या घरी पोहोचला. कोणालाही शंका येऊ नये म्हणून तो शेजाऱ्याच्या भिंतीचा आधार घेत घराच्या छतावरुन आत शिरला. घरात सर्वजण गाढ झोपेत असताना त्याने अचानक चाकूने आपली पत्नी प्रीती, सासू सुशीला, सासरे अंतू आणि मुलगा अवि यांच्यावर एकामागून एक वार करण्यास सुरुवात केली. या भीषण हल्ल्यात प्रीती आणि सुशीला यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे तीनच्या सुमारास सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी मायलेकींना मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या अंतू गुप्ता यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने वाराणसीला संदर्भीत (रेफर) करण्यात आले.

Uttar Pradesh Double Murder News
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. प्राथमिक तपासात कौटुंबिक कलह आणि पत्नीच्या चारित्र्यावरील संशय हेच या हत्याकांडामागचे मुख्य कारण असल्याचे समोर आले. अमितला पकडण्यासाठी पोलिसांनी (Police) विविध पथके तैनात केली असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. भरवस्तीत आणि भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून एका संशयी पतीने आपल्या सुखी संसाराचा अंत अशा क्रूर पद्धतीने केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com