Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

U-23 Cricket ODI Tournament: गोव्याचे फलंदाज फेल! अवघ्या 60 धावांत संघ गारद; मध्यप्रदेशने आठ विकेट्सनी जिंकला सामना

Madhya Pradesh Defeats Goa: गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाने एकदिवसीय स्पर्धेत मंगळवारी अतिशय खराब फलंदाजी केली. त्यांच्यावर अवघ्या ६० धावांत गारद होण्याची वेळ आली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाने एकदिवसीय स्पर्धेत मंगळवारी अतिशय खराब फलंदाजी केली. त्यांच्यावर अवघ्या ६० धावांत गारद होण्याची वेळ आली. छत्तीसगडमधील भिलाई येथे ड गट सामन्यात मध्य प्रदेशने आठ विकेट राखून विजय नोंदविताना आवश्यक धावा ७.३ षटकात गाठल्या.

सामन्यात गोव्याने (Goa) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली; परंतु हा निर्णय त्यांच्या अंगलट आला आणि डाव १९व्या षटकात संपुष्टात आला. गोव्याची ही २३ वर्षांखालील वयोगटातील अतिशय निराशाजनक फलंदाजी ठरली. डावातील अकराव्या षटकात ६ बाद ३९ धावा अशी दयनीय स्थिती झालेल्या गोव्याला नंतर सावरताच आले नाही. पहिल्या सामन्यात झारखंडविरुद्ध (Jharkhand) १२९ धावांनी पराभूत झालेल्या गोव्याला मंगळवारी सलग दुसऱ्या पराभवाचा सामोरे जावे लागले.

संघाच्या निराशाजनक फलंदाजीत फक्त दोघाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. कर्णधार शिवेंद्र भुजबळ याने १९, तर कौशल हट्टंगडी याने १३ धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल मध्य प्रदेशची २ बाद ११ अशी घसरगुंडी उडाली होती. मात्र, त्यांच्या चंचल राठोड आणि अनिकेत वर्मा यांनी नंतर आक्रमक फलंदाजी करत संघाला आठव्या षटकातच विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक : गोवा १९ षटकांत सर्वबाद ६० (कौशल हट्टंगडी १३, शिवेंद्र भुजबळ १९, रामवीरसिंग गुर्जर ५-२१, अधीर प्रताप सिंग २-११, सौम्यकुमार पांडे ३-६) पराभूत वि. मध्य प्रदेश ७.३ षटकांत २ बाद ६६ (चंचल राठोड नाबाद २३, अनिकेत वर्मा नाबाद ३२, मनीष काकोडे ४-०-३९-१, शिवम प्रताप सिंग ३.३-०-२७-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT