Lionel messi India visit Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Lionel Messi In India: ठरलं! भारतात येतोय फुटबॉलचा बादशहा 'मेस्सी'; केरळमध्ये खेळणार सामना

Lionel Messi Kerala Visit: फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी आणि त्याचा अर्जेंटिना संघ १० ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत केरळला भेट देणार असल्याची अधिकृत घोषणा अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने केली आहे.

Sameer Panditrao

तिरुअनंतपुरम: फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी आणि त्याचा अर्जेंटिना संघ १० ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत केरळला भेट देणार असल्याची अधिकृत घोषणा अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने केली आहे. भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या या कार्यक्रमात, विश्वविजेता अर्जेंटिना संघ येथील ग्रीनफिल्ड स्टेडियमवर एक प्रदर्शनीय सामना खेळणार आहे.

अर्जेंटिनाचा हा सामना केरळ सरकार आणि रिपोर्टर ब्रॉडकास्टिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे. मेस्सी आणि त्याचा अर्जेंटिना संघ केरळमध्ये खेळणार, असे निश्चित होत होते;

परंतु हा दौरा रद्द झाल्याचे वृत्त प्रसरले होते. आता अशा अफवांवर आणि चुकीच्या बातम्यांवर या घोषणेमुळे पूर्णविराम लागला आहे. फिफाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळापत्रकातील अडचणीमुळे अर्जेंटिनाचा संघ केरळला येणार नाही, असे मे महिन्यात प्रसिद्ध होत होते.

यावर प्रतिक्रिया देताना रिपोर्टर टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक आणि संपादक अँटो ऑगस्टीन यांनी सांगितले, अर्जेंटिना फुटबॉल संघटनेकडून हा दौरा रद्द झाल्याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.

आमच्याकडून तयारी व्यवस्थित सुरू आहे. चुकीच्या बातम्या पसरवू नयेत. या अधिकृत वृत्तामुळे केरळच्या फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

कतार विश्वचषकादरम्यान केरळच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रचंड पाठिंब्याने प्रभावित होऊन अर्जेंटिनाच्या संघाने ही भेट ठरवली होती. २४ सप्टेंबर २०२४ रोजी केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुर्रहिमान यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली होती.

त्यांनी म्हटले होते, केरळच्या फुटबॉल चाहत्यांचे प्रेम आणि समर्थन अविस्मरणीय आहे. अर्जेंटिनाचा संघ त्यांच्याशी थेट संवाद साधण्यास उत्सुक आहे.

विश्वविजेत्या संघाचे यजमानपद भूषवण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित होता, तरी केरळ सरकारने अर्जेंटिना फुटबॉल संघटनेला निमंत्रण दिले. त्यानंतर झालेल्या ऑनलाइन चर्चेत अर्जेंटिनाच्या संघाने केरळमधील फुटबॉल विकासासाठी सहकार्याची तयारी दर्शवली.

या भेटीमुळे केरळच्या क्रीडा क्षेत्रालाही मोठा चालना मिळेल. अर्जेंटिना फुटबॉल संघटनेच्या सहकार्यामुळे केरळमध्ये फुटबॉल विकास कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे आणि प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठी उपक्रम राबवले जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT