सासष्टी: कोप्पल-कर्नाटक येथे झालेल्या १३व्या राष्ट्रीय पिनाक सिलट अजिंक्यपद स्पर्धेत गोवा संघाने एकूण १२ पदके जिंकली. यात एक सुवर्ण, ३ रौप्य व ८ कांस्यपदकांचा समावेश आहे.
गोवा संघातील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे: १) सुवर्णपदक - आदिती अंबर कामत (टेन्डींग, सिंगा महिला क्लास सी १८ ते २० किग्रॅम गट), २) रौप्यपदक - अनन्या खराडे (टेन्डींग, सिंगा महिला क्लास ई - २०-२४ किग्रॅम गट), आरव सावंत (टेन्डींग, माकन पुरुष- २० किग्रॅमखाली)
ख्रिसिलेव फर्नांडिस (टेन्डींग माकान पुरुष क्लास एच - ३४-३६ किग्रॅम), ३) कांस्यपदक - शिवांश देसाई, श्रीदा भजे, जेडन लूक गोम्स, माथियस पारशा, ख्रिसी फर्नांडिस, सुभश्री जेठी, आद्याशा प्रियदर्शनी समल, सुभश्री जेठी व आद्याशा प्रियदर्शनी समल (जोडी).
या संघाबरोबर मुख्य प्रशिक्षक म्हणून ॲंथनी केडली ब्रागांझा, व्यवस्थापक म्हणून ज्योकी आंतोनियो दा सिल्वा, साहाय्यक प्रशिक्षक म्हणून उदय कारबोटकर, मधू कमलेश चौहान व अधिकारी म्हणुन निलुफर खान हे गेले होते. या अप्रतिम कामगिरीसाठी द पिनाक सिलट असोसिएशनने खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.