Joe Root Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Joe Root Test Century: लॉड्सवर जो रुटचा शतकी दणका! भारताविरुद्ध पुन्हा एकदा केली कमाल; 'या' दिग्गजांना सोडले मागे

Joe Root 37th Test century: इंग्लंडच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या जो रुटने आणखी एक कसोटी शतक झळकावले.

Manish Jadhav

Joe Root Test Century: इंग्लंडच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या जो रुटने आणखी एक कसोटी शतक झळकावले. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी रुटची शतक ठोकण्याची संधी हुकली होती. तो पहिल्या दिवशी 99 धावांवर पॅव्हेलियनमध्ये नाबाद परतला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने त्याला एक नाही तर दोन धावा घेऊन शतक पूर्ण करण्याची संधी दिली होती, परंतु त्यानंतरही तो 99 धावांवर नाबाद परतला. यानंतर दुसऱ्या दिवशी सामना सुरु झाला तेव्हा पहिल्या चेंडूपासूनच सर्वांना वाटत होते की, रुट त्याचे शतक कधी पूर्ण करेल. त्यानेही जास्त विलंब न करता एक धाव काढत आपले शतक पूर्ण केले.

रुटने शानदार शतक झळकावले

दरम्यान, या शतकासह रुटने अनेक खेळाडूंना मागे सोडले. जर फक्त त्याच्या कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, हे रुटचे 37 वे शतक आहे. राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 36 शतके झळकावली आहेत. आतापर्यंत ते रुटच्या बरोबरीने होते, परंतु आता रुट त्यांच्या पुढे गेला. तसेच, रुटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास तिथेही त्याने महेला जयवर्धनेला मागे सोडले.

रुटने महेलाला मागे टाकत हाशिम अमलाशी बरोबरी केली

कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मिळून रुटचे हे 55वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर 100 शतके झळकावून पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा महेला जयवर्धनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 54 शतके झळकावली आहेत, तो आता रुटच्या मागे आहे. हाशिम अमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 55 शतके झळकावली आहेत. रुटने आता त्याच्याशी बरोबरी केली.

जो रुट कसोटी क्रिकेटमधील स्टार

जो रुटने (Joe Root) आतापर्यंत 156 कसोटी सामन्यांमध्ये 13 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर सध्या 15,921 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे, परंतु रुट लवकरच रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांना मागे टाकू शकतो. त्यांना मागे टाकण्यासाठी रुटला फार मोठी खेळी खेळण्याची गरज नाही. जर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, रुट सध्या त्या यादीत 5व्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT