Basketball World Championship Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

Jeshua Pinto Basketball Player: गोमंतकीय बास्केटबॉलपटू जेशुआ पिंटो जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोमंतकीय बास्केटबॉलपटू जेशुआ पिंटो जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्पर्धा जर्मनीत १९ जुलैपासून खेळली जाईल.

जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत जेशुआची निवड गोव्यासाठी भूषणावह ठरली आहे. जर्मनीतील राईन-रुर येथे जागतिक स्पर्धा होत असून १८ विविध खेळांत दीडशेहून अधिक देशांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताचा तीनशे सदस्यीय चमू स्पर्धेत भाग घेत आहे. जेशुआची भारताच्या पुरुष बास्केटबॉल संघात निवड झाली.

गुजरातचा कृष्णपालसिंग गोहिल बास्केटबॉल संघाचा कर्णधार असून ध्यानचंद पुरस्कार विजेते रामकुमार संघाचे प्रशिक्षक आहेत. संघाचे कोची येथे प्रशिक्षण शिबिर पार पडले. स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश असून अमेरिका, रुमानिया, लाटव्हिया हे गटातील अन्य संघ आहेत. कळंगुट येथील जेशुआ २३ वर्षांचा आहे. त्याची आई हेलन पिंटो या त्याच्या प्रारंभिक प्रशिक्षक आहेत.

बास्केटबॉलसह फुटबॉलमध्ये पारंगत

हेलन यांनी जेशुआच्या क्रीडा मैदानावरील वाटचालीविषयी सांगितले, की ‘लहानपणी जेशुआ अष्टपैलू क्रीडापटू होता. तो फुटबॉल व बास्केटबॉल या दोन्ही खेळांत पारंगत होता. वयाच्या १४व्या वर्षी त्याने बास्केटबॉल अधिक गांभीर्याने घेतले. या खेळात त्याने खूपच मेहनत घेतली जी वाखाणण्याजोगी आहे. त्याने हे यश स्वतः कमावलेले आहे. सिमेंटच्या कोर्टवर प्रशिक्षण घेत त्याने उत्तम संधीसाठी राज्याबाहेर जाण्यास प्राधान्य दिले.’

उल्लेखनीय कामगिरी

जेशुआने शालेय शिक्षण साळगाव येथील लुर्ड्‌स कॉन्व्हेंटमध्ये पूर्ण केले. नंतर चेन्नईतील लॉयला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले, तर आता तो राजस्थानमधील कोटा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. राष्ट्रीय सीनियर बास्केटबॉल स्पर्धांत त्याने गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. बास्केटबॉलमध्ये जेशुआने २०२३ मधील ‘खेलो इंडिया विद्यापीठ’ स्पर्धेत सुवर्णपदक, २०२४ मधील अखिल भारतीय विद्यापीठ ३ बाय ३ बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले असून २०२५ मधील आयएनबीएल लीग २५ वर्षांखालील स्पर्धेसाठी त्याची दिल्ली ड्रिबलर्स संघात निवड झाली.

अल्पावधीत मोठी मजल

‘साळगाव येथील लुर्ड्‌स बास्केटबॉल क्लब या संघातून राज्यस्तरीय स्पर्धांत जेशुआ खेळायचा. हा संघ अंडरडॉग्ज होता. मात्र, जेशुआने शानदार खेळाने लक्ष वेधले. अल्पावधीतच त्याने डीबीओ फातोर्डा, वायएमसीए नाईट्स, सोनिक्स या संघांतर्फे खेळण्याइतपत मजल मारली. अथक मेहनत, शिस्तीच्या बळावर जेशुआने प्रगती साधली. तो अत्यंत नम्र, प्रामाणिक व इतर खेळाडूंना प्रेरक आहे. त्याच्या यशामुळे गोवा बास्केटबॉल असोसिएशन व राज्यातील बास्केटबॉल समुदाय अत्यंत आनंदी आहे,’ असे राज्य बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष संदीप हेबळे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

Annabhau Sathe: अण्णांचा रशिया दौरा कसा होता? तेथील धर्म, वर्ण, स्त्री समानता याबाबत त्यांनी काय निरीक्षण नोंदवले?

Murder Trial: मांगोरहिल - वास्को खून प्रकरणात अझीम शेख दोषी; सोमवारी काय सुनावली जाणार शिक्षा?

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

SCROLL FOR NEXT