Viral Video: चिमुकल्याला पाठीवर बसवून डॉल्फिनची 'जलसफर'! हृदयस्पर्शी व्हिडीओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Dolphin Viral Video: सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, जे केवळ लोकांचे लक्षच वेधून घेत नाहीत, तर त्यांच्या चेहऱ्यावर हसूही आणतात.
Dolphin Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Dolphin Viral Video: सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, जे केवळ लोकांचे लक्षच वेधून घेत नाहीत, तर त्यांच्या चेहऱ्यावर हसूही आणतात. अलीकडेच असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक प्रशिक्षित डॉल्फिन एका लहान मुलाला आपल्या पाठीवर बसवून स्विमिंग पूलमध्ये विहरताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून निसर्ग आणि माणूस यांच्यातील सुंदर नाते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Dolphin Viral Video
Viral Video: बापाने मुलाकडून घेतली अशी शपथ, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक; 'स्वतःचा जीव पणाला लावून...'

दरम्यान, हा व्हिडीओ (Video) एका स्विमिंग पूलमधील आहे. त्यात एक लहान मुलगा आपल्या आईसोबत पाण्यात असून त्यांच्यासोबत एक डॉल्फिनही दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, आई आपल्या चिमुकल्याला डॉल्फिनच्या पाठीवर बसवते. त्यानंतर डॉल्फिन त्या चिमुकल्याला घेऊन सैर मारतो. मुलगा खूप आनंदी दिसत असून हसत हसत प्रवास एन्जॉय करत आहे. डॉल्फिन मोठ्या काळजीने आणि हुशारीने मुलाला पाठीवर घेऊन सैर मारताना दिसत आहे. या मायलेकाजवळ तो इतक्या प्रेमाने वागत आहे की, हे दृश्य खूप मनमोहक दिसते. दुसरीकडे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांना हा व्हिडीओ इतका आवडला की, पाहणारे लोक लाईक आणि शेअर करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत.

डॉल्फिनची हुशारी पाहून लोक थक्क

डॉल्फिनला निसर्गातील सर्वात बुद्धिमान आणि संवेदनशील प्राण्यांपैकी एक मानले जाते. त्याचा स्वभाव अतिशय मैत्रीपूर्ण असतो आणि ते माणसांमध्ये लवकर मिसळून जातात. अनेक देशांमध्ये मुलांचे आणि मोठ्या लोकांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी 'डॉल्फिन थेरपी'चा उपयोग केला जातो. या व्हायरल व्हिडीओमध्येही डॉल्फिनचा हाच मैत्रीपूर्ण आणि सौम्य स्वभाव पाहायला मिळतो. मुलाला पाठीवर बसवून पोहण्याची कला केवळ डॉल्फिनची हुशारीच दर्शवत नाही, तर तो किती संवेदनशील आणि काळजी घेणारा असू शकतो, हेही दाखवते.

Dolphin Viral Video
Viral Video: हरभजन सिंह आणि श्रीसंतचा 'तो' वाद पुन्हा चर्चेत, अखेर 17 वर्षांनी व्हिडिओ आला समोर; ललित मोदींनी केला मोठा खुलासा

दुसरीकडे, हा व्हिडीओ सोशल मीडियावरील (Social Media) एक्सवर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिण्यापर्यंत हा व्हिडीओ तब्बल 12 लाख लोकांनी पाहिला असून 27 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी याला “प्रेम आणि मैत्रीचा अनोखा संगम” म्हटले, तर काहींनी “निसर्ग आणि माणसांमधील सुंदर नाते” असे म्हटले. त्याचवेळी, डॉल्फिनने इतक्या प्रेमाने आणि काळजीने मुलाला पाण्यात कसे फिरवले, यावर अनेक यूजर्संनी आश्चर्यही व्यक्त केले. हा व्हिडीओ खऱ्या अर्थाने प्रेम, विश्वास आणि मैत्रीचे प्रतीक बनला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com