Duleep Trophy 2025: 13 चौकार, 3 षटकार! आयुष बडोनीचा 'डबल धमाका'; द्विशतक ठोकून टीमला पोहोचवले उपांत्य फेरीत

Ayush Badoni Double Century: देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेत नॉर्थ झोनचा धडाकेबाज फलंदाज आयुष बडोनीने कमाल केली.
Ayush Badoni Double Century
Ayush Badoni Dainik Gomantak
Published on
Updated on

Duleep Trophy 2025: देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेत नॉर्थ झोनचा धडाकेबाज फलंदाज आयुष बडोनीने कमाल केली. त्याने ईस्ट झोनविरुद्धच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात दमदार द्विशतक झळकावून आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. या सामन्यात पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर नॉर्थ झोनने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.

आयुष बडोनीची शानदार खेळी

दरम्यान, ईस्ट झोनविरुद्धच्या सामन्यात आयुष बडोनीने दुसऱ्या डावात 223 चेंडूंत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 204 धावांची दमदार खेळी खेळली. हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठरले. याआधी त्याने मागील वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) झारखंडविरुद्ध दिल्लीकडून खेळताना नाबाद 205 धावांची खेळी खेळली होती. या दमदार कामगिरीमुळे तो आता फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दोन द्विशतके झळकावणारा फलंदाज बनला.

या सामन्याच्या पहिल्या डावातही आयुषने 60 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 63 धावा केल्या होत्या, पण दुसऱ्या डावात त्याने द्विशतक झळकावून पहिल्या डावाची कसर भरुन काढली. आयुषच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. आतापर्यंत त्याने 14 सामन्यांतील 21 डावांमध्ये 4 शतके आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 1063 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या आयुषने या सामन्यात आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली. त्याने ईस्ट झोनच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल करत धावांचा पाऊस पाडला, ज्यामुळे नॉर्थ झोनच्या धावसंख्येत मोठी वाढ झाली.

नॉर्थ झोनचा उपांत्य फेरीत प्रवेश

पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात नॉर्थ झोनने पहिल्या डावात 405 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना रियान परागच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोनचा पहिला डाव केवळ 230 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे नॉर्थ झोनला पहिल्या डावात 175 धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात बडोनीच्या शानदार द्विशतकासह कर्णधार अंकित कुमार (198 धावा) आणि यश धुल (133 धावा) यांच्या शतकी खेळीमुळे नॉर्थ झोनने 4 बाद 685 धावांचा डोंगर उभारला.

या डावानंतर दोन्ही संघांच्या सहमतीने सामना अनिर्णित (Draw) घोषित करण्यात आला. पण पहिल्या डावात घेतलेल्या मोठ्या आघाडीमुळे नॉर्थ झोनने उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. या सामन्यात ईस्ट झोनकडून खेळणाऱ्या अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला चमक दाखवता आली नाही. त्याला 34 ओव्हर्समध्ये तब्बल 136 धावा देऊन केवळ एकच विकेट मिळाली. आयुष बडोनी आणि अंकित कुमार यांच्या शानदार फलंदाजीपुढे शमीची गोलंदाजी निष्प्रभ ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com