Manolo Marquez | FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: ईस्ट बंगालसोबतच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक मार्केझनी केले मोठे विधान, म्हणाले 'सहज गुण मिळणार नाहीत....'

FC Goa Vs East Bengal: एफसी गोवाचे सध्या १५ सामन्यांतून २७ गुण झाले आहेत. रविवारी विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाल्यास ते दुसऱ्या स्थानी येतील.

Sameer Panditrao

ISL 2024-25 FC Goa Vs East Bengal

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत लागोपाठ दोन बरोबरी नोंदविल्यामुळे एफसी गोवाच्या शिल्ड जिंकण्याच्या इच्छेला थोडाफार तडा गेला, आता त्यांनी पुन्हा मुसंडी घेत विजयी कामगिरी निर्धार बाळगला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १९) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला ईस्ट बंगालच्या आव्हानास सामोरे जावे लागेल.

एफसी गोवाचे सध्या १५ सामन्यांतून २७ गुण झाले आहेत. रविवारी विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाल्यास ते दुसऱ्या स्थानी येतील. त्या अनुषंगाने मार्केझ यांनी शनिवारी सांगितले, की ‘‘प्रत्येक सामना खडतर आहे, सहज गुण मिळणार नाही अशा टप्प्यावर आलो आहोत.

आता आमच्यासाठी पुढील सामने महत्त्वाचे आहेत. कामगिरीवर ध्यान केंद्रित करणे आवश्यक असून रविवारी जिंकणे हेच ध्येय आहे.’’ मार्केझ यांनी ईस्ट बंगालला कमी लेखले नाही. ते म्हणाले, गुणतक्त्यातील स्थितीनुसार त्यांची तुलना करणे अयोग्य आहे. निश्चितच सामना कठीण असेल.

ईस्ट बंगालचे १५ सामन्यांतून १४ गुण आहेत. प्रशिक्षक ऑस्कर ब्रुझाँ यांना त्याची जाणीव आहे, मात्र ते प्ले-ऑफ फेरी गाठण्याबाबत आशावादी आहेत. त्यांनी आता ओळीने तीन सामने जिंकण्याचे उद्दिष्ट राखले आहे. एफसी गोवा संघ ताकदवान असला, तरी आम्ही विजयी कामगिरीसाठी इच्छुक असल्याचे ब्रुझाँ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT