Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: पराभव विसरून FC Goa मैदान मारणार का? 'प्ले-ऑफ'च्या आशेसाठी ओडिशालाही विजयाची गरज

FC Goa Vs Odisha FC: मागील लढतीत एफसी गोवास जमशेदपूर येथे ३-१ असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांची सलग अपराजित मालिका १३व्या सामन्यात संपुष्टात आली.

Sameer Panditrao

ISL 2024-25 FC Goa Vs Odisha FC

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत जमशेदपूर एफसीविरुद्ध मागील लढतीतील पराभव विसरून एफसी गोवा गुरुवारी (ता. ६) ओडिशा एफसीविरुद्धच्या लढतीसाठी मैदानात उतरणार आहे.

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. सामन्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी पत्रकार परिषदेत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘मागील लढतीत आम्ही अतिशय खराब खेळलो हे मान्य, आता तो पराभव विसरून आम्हाला चांगली कामगिरी बजावावी लागेल आणि आम्ही ते साध्य करू शकतो.’’

सर्बियन मध्यरक्षक देयान द्राझिच तंदुरुस्तीच्या दिशेने असून त्याने संघासोबत सराव केला. कदाचित तो ओडिशाविरुद्धच्या लढतीत खेळू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. एफसी गोवा संघ सातत्यात कमी पडल्याचे मार्केझ यांनी कबुल केले.

मागील लढतीत एफसी गोवास जमशेदपूर येथे ३-१ असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांची सलग अपराजित मालिका १३व्या सामन्यात संपुष्टात आली. ओडिशाने पिछाडीवरून भुवनेश्वर येथे नॉर्थईस्ट युनायटेडला २-२ असे गोलबरोबरीत रोखले.

सध्या एफसी गोवा ३३ गुणांसह तिसऱ्या, तर ओडिशा २५ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. पुन्हा दुसरा क्रमांक मिळविण्यासाठी एफसी गोवास, तर प्ले-ऑफ फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी ओडिशा एफसीला गुरुवारी विजय अत्यावश्यक असेल.

मोहन बागान प्ले-ऑफमध्ये

आयएसएल स्पर्धेची यंदा प्ले-ऑफ फेरी गाठणारा पहिला संघ हा मान मोहन बागानने बुधवारी मिळविला. कोलकत्यात त्यांनी पंजाब एफसीला ३-० फरकाने नमवून स्पर्धेतील १४व्या विजयाची नोंद केली.

मोहन बागानचे २० सामन्यांतून सर्वाधिक ४६ गुण झाले असून अग्रस्थानावरील संघाने ‘शिल्ड’ पटकावण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. स्पर्धेतील नवव्या पराभवामुळे पंजाब एफसीचे १८ सामन्यांतून २३ गुण कायम राहिले. ते आता नवव्या क्रमांकावर आहेत. मोहन बागानसाठी जॅमी मॅक्लॅरेन याने दोन, तर लिस्टन कुलासोने एक गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT