ISL 2024-25 FC Goa  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: FC Goa चा मौकेपे चौका! 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या ओडिशाला दिली मात; 36 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप

FC Goa Vs Odisha FC: एफसी गोवाचा हा स्पर्धेतील दहावा विजय ठरला. त्यांचे आता १९ सामन्यांतून ३६ गुण झाले आहेत.

Sameer Panditrao

ISL 2024-25 FC Goa Vs Odisha FC

पणजी: एफसी गोवा संघाने मागील पराभवातून सावरताना गुरुवारी रात्री दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या ओडिशा एफसीला २-१ फरकाने नमविले आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ३६ गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सामना झाला.

एफसी गोवाच्या ब्रायसन फर्नांडिस याने पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली, २३ वर्षीय विंगरने बोर्हा हेर्रेरा याच्या असिस्टवर डाव्या पायाने चेंडू नियंत्रित करून २९व्या मिनिटास यजमान संघाला आघाडी मिळवून दिली. ३८व्या मिनिटास एफसी गोवाचा गोलरक्षक ऋतिक तिवारी याने आपल्या डाव्या बाजूने पूर्णपणे झेपावत दिएगो मॉरिसियो याचा पेनल्टी फटका विफल ठरविला.

त्यामुळे पाहुण्या संघाला बरोबरी साधता आली नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या स्वयंगोलमुळे ४७व्या मिनिटास एफसी गोवाची आघाडी वाढली. बोर्हाच्या पासवर ब्रायसन याने मारलेला फटका ओडिशाच्या लाल्थाथांगा खॉल्‍हरिंग याला चाटून गोलनेटमध्ये घुसला. ५४व्या मिनिटास के. पी. राहुल याने ओडिशाचा पिछाडी एका गोलने कमी केली.

सामन्याच्या ७३व्या मिनिटास ओडिशा एफसीच्या अहमद जाहो याला १५०व्या आयएसएल लढतीत रेड कार्ड मिळाले. हँडबॉलमुळे सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डसह त्याला मैदान सोडावे लागले आणि ओडिशा एफसीला दहा खेळाडूंसह खिंड लढवावी लागली. सामन्याच्या २८व्या मिनिटास जाहो याच्या थेट फ्रीकिकवर निर्णायक क्षणी चेंडू क्रॉसबारला आपटून बाहेर गेल्याने ओडिशाची चांगली संधी हुकली होती.

एफसी गोवाचा हा स्पर्धेतील दहावा विजय ठरला. त्यांचे आता १९ सामन्यांतून ३६ गुण झाले आहेत. पहिल्या क्रमांकावरील मोहन बागानचे २० लढतीतून ४६ गुण असून तिसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीचे १८ सामन्यांतून ३४ गुण आहेत. एफसी गोवा संघ पुढील सामना १२ फेब्रुवारी रोजी मुंबई सिटी एफसीविरुद्ध मुंबई येथे खेळेल. १९ लढतीतील सहाव्या पराभवामुळे ओडिशा एफसी २५ गुणांसह सातव्या स्थानी राहिला.

दृष्टिक्षेपात सामना

ब्रायसन फर्नांडिसचे यंदा ओडिशा एफसीविरुद्ध ३, तर मोसमात एकूण ७ गोल

आयएसएलमधील १२ लढतीत एफसी गोवा ओडिशाविरुद्ध अपराजित (८ विजय, ४ बरोबरी)

फातोर्डा येथे एफसी गोवाचे यंदा १० सामन्यांत ६ विजय, २ बरोबरी व २ पराभव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT