FC Goa team players | Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: चुरस वाढली! अपराजित FC Goaची 'शिल्ड'वर नजर; 'चेन्नईयीन'विरुद्धचा सामना ठरणार निर्णायक

FC Goa Vs Chennaiyin FC: मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघ सध्या सलग ११ सामने अपराजित आहे, यामध्ये सात विजय व चार बरोबरींचा समावेश आहे.

Sameer Panditrao

ISL 2024-25 FC Goa Vs Chennaiyin FC

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या अव्वल स्थानी असलेल्या मोहन बागानला लागोपाठ दोन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागले, त्यामुळे आता ‘शिल्ड’साठी चुरस वाढली आहे. त्या दृष्टीने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी (ता. २५) चेन्नईयीन एफसीविरुद्धचा सामना एफसी गोवासाठी महत्त्वाचा असेल.

सध्या पहिल्या स्थानावरील मोहन बागानचे ३७, तर एफसी गोवाचे ३० गुण आहेत. चेन्नईयीन एफसीविरुद्ध विजयाचे पूर्ण तीन प्राप्त केल्यास एफसी गोवाचे अग्रस्थानावरील संघापेक्षा चार गुण कमी राहतील. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघ सध्या सलग ११ सामने अपराजित आहे, यामध्ये सात विजय व चार बरोबरींचा समावेश आहे.

मागील लढतीत त्यांनी फातोर्डा येथे ईस्ट बंगालला १-० असे निसटते नमविले होते. चेन्नईयीन एफसी सध्या प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यांचे १७ सामन्यांतून १८ गुण झाले असून सध्या दहाव्या क्रमांकावर ते आहेत. मागील लढतीत त्यांनी चेन्नईत मोहन बागानला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यांची ती सलग तिसरी बरोबरी ठरली. फातोर्डा येथे होणाऱ्या सामन्यासाठी १२ वर्षे आणि त्याखालील वयोगटातील मुलांसाठी मोफत प्रवेश असेल.

आकडेवारीत प्रतिस्पर्धी

२०१४ पासून एकमेकांविरुद्धच्या २९ सामन्यांत एफसी गोवाचे १७, तर चेन्नईयीनचे ९ विजय, ३ बरोबरी

यंदा आयएसएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात २४ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे २-२ गोलबरोबरी

चेन्नईयीन एफसीविरुद्ध एफसी गोवा सलग ५ सामने अपराजित

एफसी गोवाविरुद्ध १८ सामने क्लीन शीट राखण्यात चेन्नईयीनला अपयश

हैदराबादचा जमशेदपूरला धक्का

आयएसएल स्पर्धेत हैदराबाद येथे गुरुवारी झालेल्या लढतीत हैदराबाद एफसीने जमशेदपूर एफसीला ३-२ असा पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे जमशेदपूरचे नुकसान झाले. १६ सामन्यांतून २८ गुणांसह ते चौथ्या स्थानी कायम राहिले. हैदराबादचा हा तिसराच विजय ठरला. १७ सामन्यांतून १३ गुणांसह ते बाराव्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT