Ishan Kishan Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ishan Kishan: "मी पुन्हा तशीच फलंदाजी करू शकतो की नाही"? ईशान किशनने उलगडले रहस्य; म्हणाला, 'मी स्वतःलाच....'

Ind Vs NZ T20: भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळालेल्या ईशान किशनने शुक्रवारी झालेल्या सामन्यात ३२ चेंडूंत ७६ धावांचा घणाघात सादर केला.

गोमन्तक डिजिटल टीम

रायपूर: क्षमता असूनही विविध कारणांमुळे गेल्या दोन वर्षांत भारतीय संघातून दूर राहणारा ईशान किशन स्वतःला एकच प्रश्न विचारत होता... मी पुन्हा भारतीय जर्सी परिधान करू शकतो का आणि तशी निर्णायक कामगिरी करू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर त्याने स्वतःच शुक्रवारी झंझावाती फलंदाजी करून दिले.

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसह न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळालेल्या ईशान किशनने शुक्रवारी झालेल्या सामन्यात ३२ चेंडूंत ७६ धावांचा घणाघात सादर केला आणि आपली क्षमता तसेच उपयुक्तता सिद्ध केली.

ईशानला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते. त्या वेळी कशी भावना मनात होती, याबाबत विचारले असता तो म्हणाला, मी प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारायचो, मी पुन्हा तशीच फलंदाजी करू शकतो की नाही? आणि त्याचे उत्तर सकारात्मकच होते.

मी स्वतःसमोर उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मला देशांतर्गत स्पर्धांत धावा करणे गरजेचे होते. पुन्हा देशासाठी खेळण्याकरिता स्वतःला सिद्ध करण्याचीही गरज होती. त्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे महत्त्वाचे होते, असे तो म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

Goan Ghost Stories: पर्वरीत पांढऱ्या वेषातील बाई दिसली, मांडवी पुलावर पोचेपर्यंत त्या भुताने माझा पाठलाग केला; भुतांचे अस्तित्व

Viral Video: जुगाड की वेडेपणा? एक कार अन् 50 प्रवासी! व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले, 'हे भारतातच शक्य'!

Goa Tour Package: गोवा वाले बीच पे...! 'IRCTC' घेऊन आलीय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज, कसं करायचं बुकिंग? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT