IND VS NZ T20: हरवले न्यूझीलंडला, रडवले पाकिस्तानला! टीम इंडियाची मोठ्या विक्रमाला गवसणी; रचला नवा इतिहास

India T20 Run Chase Record: टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
India T20 Run Chase Record
India T20 Run Chase RecordDainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. २०९ धावांचे आव्हान अवघ्या १५.२ षटकांत पूर्ण करत भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला असून, टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान २००+ धावांचा यशस्वी पाठलाग नोंदवला आहे.

या ऐतिहासिक विजयात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांची तुफानी भागीदारी निर्णायक ठरली. न्यूझीलंडने २०८/६ अशी धावसंख्या उभारल्यानंतर भारतासमोर २०९ धावांचे मोठे लक्ष्य होते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय फलंदाजांनी अवघ्या १५.२ षटकांत हे आव्हान पूर्ण केले आणि २८ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.

यामुळे भारताने पाकिस्तानचा २४ चेंडू शिल्लक ठेवून केलेल्या २०५ धावांच्या पाठलागाचा विक्रम मोडला. भारतासाठी हा सर्वाधिक यशस्वी रनचेस ठरला असून, यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२३ मध्येही भारताने २०९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने सहाव्यांदा २०० अधिक धावांचा पाठलाग यशस्वी केला असून या बाबतीत ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.

किशन–सूर्या

भारताची सुरुवात खराब झाली होती आणि संघ १.१ षटकांत ६/२ असा अडचणीत होता. मात्र, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी केवळ ४८ चेंडूत १२२ धावांची स्फोटक भागीदारी करत सामन्याचा पूर्ण चेहरा बदलून टाकला.

India T20 Run Chase Record
Team India New Coach: टीम इंडियाला मिळणार नवा कोच, इंग्लंडचा 'हा' दिग्गज सांभाळणार जबाबदारी

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत शिवम दुबे म्हणाला, “इशान किशन हा मी पाहिलेल्या सर्वोत्तम डावखुऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याला ‘स्मॉल पॉकेट ब्लास्ट’ म्हणतात. सूर्यकुमार यादवबद्दल बोलताना दुबे म्हणाला, “सूर्या फॉर्ममध्ये असेल, तर जगाला माहिती आहे तो काय करू शकतो. आज त्याने पुन्हा दाखवून दिलं की तो टी-२० मधील नंबर वन फलंदाज का आहे.”

India T20 Run Chase Record
UAE President India Visit: दोन तासांचा 'सस्पेन्स' दौरा! युएई अध्यक्षांची अचानक भारत भेट; मोठ्या निर्णयाची शक्यता? VIDEO

न्यूझीलंड

न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र आणि कर्णधार मिचेल सॅन्टनर यांनी दमदार फलंदाजी केली. रवींद्रने २६ चेंडूत ४४ धावा करताना दोन चौकार आणि चार षटकार मारले, तर सॅन्टनरने नाबाद ४७ धावा केल्या. या कामगिरीमुळे न्यूझीलंडने भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. भारतीय गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com