Konstantin Belousov Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Indian Air Force: सर्वात विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे, स्पर्धेच्या सांघिक (Team) गटामध्ये भारतीय वायुदलाच्या तिन्ही संघांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली.

Manish Jadhav

पणजी: आंतरराष्ट्रीय स्तरावर खडतर शारीरिक क्षमतेची आणि मानसिक संयमाची परीक्षा घेणाऱ्या 'आयर्नमॅन 70.3' (Ironman 70.3) स्पर्धेत यंदा उझबेकिस्तानचा कॉन्स्टीटन बेलोसोव्ह (Konstantin Belousov) आणि ब्रिटनची एली गॅरेट (Ellie Garrett) यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल क्रमांक पटकावला. गोव्यातील मिरामार येथे आयोजित या स्पर्धेत 31 देशांतील सुमारे 1300 ट्रायथलिट्सनी (Triathletes) भाग घेतला.

सर्वात विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे, स्पर्धेच्या सांघिक (Team) गटामध्ये भारतीय वायुदलाच्या (Indian Air Force) तिन्ही संघांनी अत्यंत प्रभावी कामगिरी करत पहिले, दुसरे आणि तिसरे असे तिन्ही क्रमांक पटकावले आणि जागतिक स्तरावर देशाचा दबदबा सिद्ध केला.

स्पर्धेचे आव्हानात्मक स्वरुप

या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये खेळाडूंना खालील तीन अत्यंत कठीण टप्पे एकापाठोपाठ पूर्ण करावे लागतात.

  • 1.9 किलोमीटर सागरी जलतरण

  • 90 किलोमीटर सायकलिंग

  • 21.1 किलोमीटर धावणे

या खडतर स्पर्धेला रविवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या उपस्थित मिरामार समुद्रकिनारी आरंभ करण्यात आला. यावेळी पर्यटन संचालक केदार नाईक, स्पर्धा संचालक दीपक राज, स्पर्धेची सदिच्छा दूत अभिनेत्री सैयामी खेर, नील डिसिल्वा, सुनील मोरजकर हेही उपस्थित होते.

विजेते आणि त्यांचे विक्रम

स्पर्धेतील विजेत्यांनी आपले कौशल्य आणि प्रचंड शारीरिक क्षमता सिद्ध करत लक्षणीय वेळेत शर्यत पूर्ण केली. उझबेकिस्तानच्या कॉन्स्टंटिन बेलोसोव्हने 4 तास 25 मिनिटे 47 सेकंद या वेळेत विजेतेपद पटकावले. ब्रिटनच्या एली गॅरेट हिने 5 तास 18 मिनिटे 43 सेकंद वेळेत स्पर्धा जिंकली. भारताची टिमटिम शर्मा महिला गटात दुसऱ्या स्थानी राहिली, ही वैयक्तिक स्तरावर देशासाठी एक अभिमानास्पद कामगिरी आहे. गोवा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित या स्पर्धेमुळे राज्यातील पर्यटन आणि साहसी खेळांना मोठे प्रोत्साहन मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT