Ironman 70.3 Goa: भारतीय सैन्यदलातील बिश्वरजीत सायकोम ठरले ‘आयर्नमॅन’चे विजेते, इजिप्तची यास्मिन हलावा महिलांमध्ये अव्वल

Ironman 70.3 Goa 2024: स्पनेच्या जेकीन बेरल याने 4:48:09 या वेळेसह दुसरा क्रमांक पटकावला तर इजिप्तच्या इराकीने 4:49:10 वेळेस तिसरा क्रमांक पटकावला.
Ironman 70.3 Goa: भारतीय सैन्यदलातील बिश्वरजीत सायकोम ठरले ‘आयर्नमॅन’चे विजेते, इजिप्तची यास्मिन हलावा महिलांमध्ये अव्वल
Ironman 70.3 Goa 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Ironman 70.3 Goa 2024

पणजी: गोव्यात पार पडलेल्या आयर्नमॅन 70.3 (IRONMAN 70.3) या आव्हानात्मक स्पर्धेत भारतीय सैन्यदलातील बिश्वरजीत सिंग सायकोम यांनी पुरुष गटात बाजी मारली आहे. बिश्वरजीत यांनी 4:47:47 या वेळेत ही स्पर्धा पूर्ण करुन अव्वल स्थान पटकावले. गेल्या दोन वर्षी हुलकावणी दिल्यानंतर अखेर त्यांनी यावर्षी स्पर्धेत बाजी मारली.

स्पनेच्या जेकीन बेरल याने 4:48:09 या वेळेसह दुसरा क्रमांक पटकावला तर इजिप्तच्या अहमद इराकीने 4:49:10 वेळेस तिसरा क्रमांक पटकावला.

भारतीय सैन्यदलाकडून नेहमीच सहकार्य मिळते. दुसरे म्हणजे तिथली शिस्त जी एखाद्या खेळाडूसाठी महत्वाची असते. मी सध्या ३७ वर्षाचा असून २००४ पासून या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू मानसिकदृष्ट्या मजबूत असने आवश्यक असते’, असे सायकोम म्हणाले.

पणजीतील मिरामार समुद्रकिनाऱ्यावरुन सकाळी या स्पर्धेला सुरुवात झाली. देश - विदेशातील हजारो स्पर्धेकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आयर्नमॅन ही जगातील एक आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. यात समुद्रात पोहणे, सायकलिंग आणि धावणे यांचा समावेश असतो.

Ironman 70.3 Goa: भारतीय सैन्यदलातील बिश्वरजीत सायकोम ठरले ‘आयर्नमॅन’चे विजेते, इजिप्तची यास्मिन हलावा महिलांमध्ये अव्वल
रशिया - युक्रेन युद्ध आंतरराष्ट्रीय शांततेसाठी मोठा धोका; जर्मन चान्सलर स्कोल्झ यांचे गोव्यात वक्तव्य

असा आहे यावर्षीच्या आयर्नमॅन स्पर्धेचा निकाल (Ironman 70.3 Goa 2024 Result)

पुरुष गट

1) बिश्वरजीत सायकोम (भारत) - 4:47:47

2) जेकीन बेरल (स्पेन) - 4:48:09

3) अहमद इराकी (इजिप्त) - 4:49:10

महिला गट

1) यास्मिन हलावा (इजिप्त) 5:22:50

2) कारीन वॅन लीरसम (नेदरलँड)

3) केतकी साठे (भारत)

आयर्नमॅन स्पर्धेत दरवर्षी भाजप खासदार तेजस्वी सूर्या सहभाग घेतात. सूर्या यांनी स्पर्धेतील काही क्षणचित्रे सोशल मिडियावर शेअर केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com